प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ८५ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
अथात्मघाते.
‘‘यमः’’ जलाग्न्युद्बंधन भ्रष्टाः प्रव्रज्यानाशकाच्युताः। विषप्रपतनप्रायः शस्त्रघातहताश्र्च ये। नवैते प्रत्यवसिताः सर्वलोकबहिस्कृताः।
चांद्रायणेन शुध्यंति तप्तकृच्छ्रद्वयेन चेति। आत्मघातिपुत्रादिर्मृतजातीयवधप्रायश्चित्तसमुच्चितमेत्कुर्यात्।
‘‘मरणमध्यवस्य निवृत्ते तु वसिष्ठः’’ आत्महननाध्यवसाये जीवन्नात्मत्यागी कृच्छ्रं द्वादशरात्रं चरेत्।
त्रिरात्रं चोपवसेदिति एतदृल्पाध्यवसाये। ‘‘अग्निपातदिबव्हध्यवसाये तु पराशरः’’ जलाग्निपतनेचैव प्रव्रज्यानाशनेषु च। प्रत्यावसितवर्णानां कथं शुद्धिर्विधीयते। प्राजापत्यद्वयेनैव तीर्थाभिगमनेन वा। वृषैकादशदानेन वर्णाः शुध्यंति ते त्रयः।
ब्राह्मणस्य प्रवक्ष्यामि वनं गत्वा चतुष्पथे। सशिखं वपनं गत्वा प्राजापत्यद्वयंचरेत्। गोद्वयं दक्षिणां दद्याच्छुद्धिं पराशरोऽब्रवीत्।
मुच्यते तेन पापेन ब्राह्मणत्वं च गच्छतीति। ‘‘अध्यवसायावृत्तौ त्वंगिराः’’ यः प्रत्यवसितोविप्रः प्रव्रज्याग्निजलादिभिः। अनाशकनिवृत्तस्तु गृहस्थत्वं चिकीर्षति। चारयेत्त्रीणि कृच्छ्राणि त्रीणि चांद्रायणानि तु।
जातकर्मादिभिः प्रोक्तैः पुनः संस्कारमर्हति
अत्मघाताविषयीं.
पाणी, अग्नि, गळफास वगैरेंच्या योगानें आत्महत्त्या करणार्याच्या पुत्रादिकास व आत्महत्त्येपासून निवृत्त झालेल्यास प्रायश्चित्त.
‘‘यम’’---पाणी, अग्नि व वर टांगून घेणें यांपासून भ्रष्ट झालेले, संन्यास व अनशन (उपास) यांपासून च्युत झालेले, विष, पर्वताच्या शिखरावरून पडणें, महाप्रस्थान, व शस्त्राचा घाव यांच्या योगानें मेलेले हे नऊ सर्व लोकांनीं बहिष्कृतलेले म्हणून प्रत्यवसित (पतित) होत. हे एका चांद्रायणानें व दोन तप्तकृच्छ्रांनीं शुद्ध होतात. ज्यानें आत्मघात केला असेल त्याच्या पुत्रादिकानें त्याच्या (आत्मघात करणाराच्या) जातीच्या वधाच्या प्रायश्चित्तासह हें प्रायश्चित्त करावें. ‘‘मरण्याचें धाडस केलें असून जर तो परत फिरला तर त्याविषयी वसिष्ठ’’---आत्महत्त्या करणारा मनुष्य आत्महत्त्या करण्याविषयीं उद्युक्त झाला असून जर तो वाचला तर त्यानें बारा दिवसांचें कृच्छ्र करावें, आणि तीन दिवस उपास करावा. हें लहान अध्यवसाया विषयी जाणावें. ‘‘अग्नीत उडी घेणें, इत्यादि मोठें धाडस केलें तर त्याविषयी पराशर’’---पाणी व अग्नि यांत पडणें, संन्यास व उपास यांपासून भ्रष्ट होणें यांविषयी प्रतयवसित (पतित) झालेल्या वर्णाची शुद्धि कशी करण्यांत येते? ते तिन्ही वर्ण दोन प्राजापत्यांच्या योगानें किंवा तीर्थास गेल्यानें किंवा अकरा वृषभांचें दान केल्यानें शुद्ध होतात. ब्राह्मणास (शुद्धि) सांगतो---त्यानें रानांत जेथें चार रस्ते फुटले असतील अशा ठिकाणीं जाऊन शेंडीसकट क्षौर करून दोन प्राजापत्यें करावी, आणि दोन गाई दक्षिणा द्यावी अशी पराशरानें शुद्धि सांगितली. तो त्या पापापासून मुक्त होऊन ब्राह्मण्याला पावतो. ‘‘अध्यवसायाची आवृत्ति केली तर त्याविषयी अंगिरस्’’---जो ब्राह्मण, संन्यास, अग्नि व पाणी इत्यादिकांच्या योगानें प्रत्यवसित (पराङ्मुख) झाला असेल, व जो उपासापासून निवृत्त झाला असेल, तो जर गृहस्थाश्रम करण्याची इच्छा करील तर, त्याचे कडून तीन कृच्छ्रें व तीन चांद्रायणें करवावी. नंतर त्याचे सांगितलेले जातकर्मादि संस्कार पुन्हा करावे.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP