प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १२६ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘आशौच्छन्ने छागलेयः’’ प्राणायामशतं कृत्वा शुध्यंते शूद्रसूतके। वैश्ये षष्ठिर्भवेद्राज्ञि विंशतिर्ब्राह्मणे दश।
एकाहं च त्र्यहं पंच सप्तरात्रमभोजनं इदमकामतः। ‘‘यत्तु मार्कंडेयः’’ भुक्त्वा तु ब्राह्मणाशौचे चरेत्सांतपनं द्विजः।
‘‘यत्तु शंखः’’ ब्राह्मणस्य तु था भुक्त्वा शौचे मासं व्रतीभवेदितितदभ्यासविषयं अत्र सर्वत्र सूतकग्रहणं मृतस्याप्युपलक्षणं।
‘‘अंगिराः’’ सूतके तु यदाविप्रोब्रह्मचारी विशेषतः। पिबेत्वानीयमज्ञानात्समश्र्नीयात्सृशेद्यदि। पानीयपाने कुर्वींत पंचगव्यस्य भक्षणं।
त्रिरात्रं भोजने प्रोक्तं स्पृष्ट्वा स्नानं विधीयते। ‘‘ब्राम्हे’’ योगोमघात्रयोदृश्याः कुंजरच्छायसंज्ञकः।
भवेन्मघायां संस्थेंदौ हंसश्रैव करे स्थितः। सूतके मृतकेवाथ ग्रस्तयोः शशिसूर्ययोः। छायायां कुंजरस्याथ भुक्त्वा तु नरकं व्रजेत्।
भुक्त्वा प्रमादाद्विप्रस्तु सकृच्चांद्रायणं चरेत्।
एतच्च प्रायश्चित्तं यज्जातीयस्याशौचिनोऽन्नं भुक्तं तज्जात्युचितमाशौचं यः सकृदन्नमश्र्नाति तस्य तावदाशौचं यावत्तेषां आशौचव्यपगमे प्रायश्चित्तं कुर्यादिति
शूद्र वगैरेंच्या सुतकांत विप्रानें अन्न खाल्लें तर प्रायश्चित्त.
‘‘सुतकाच्या अन्नाविषयीं छागलेय’’---शूद्राच्या सुतकांत शंभर प्राणायाम, वैश्याच्या साठ, क्षत्रियाच्या वीस व ब्राह्मणाच्या दहा प्राणायाम करून ब्राह्मणादिकांच्या क्रमानें एक, तीन, पाच, व सात दिवस उपास करावा म्हणजे ते शुद्ध होतात. हें (प्रायश्चित्त) अज्ञानाविषयीं आहे. ‘‘जें तर मार्कंडेय’’ द्विजानें ब्राह्मणाच्या आशौचांत भोजन केलें तर सांतपन व्रत करावें’’ असें म्हणतो आणि ‘‘जें तर शंख’’ ब्राह्मणाच्या आशौचांत भोजन केल्यानें एक महिनापर्यंत व्रत करावें.’’ असें म्हणतो तें अभ्यासाविषयीं जाणावे. येथे सर्व वचनांत सूतक पद आहे त्यावरून तें मेलेल्याचें ही उपलक्षण जाणावे. ‘‘अंगिरस्’’---जर ब्रह्मचारी असा ब्राह्मण सूतकांत अज्ञानानें पाणी पिईल, भोजन करील व स्पर्श (सुतक्यास) करील तर त्यानें पाणी प्यालें असतां पंचगव्य प्यावें. भोजन केलें तर तीन दिवस पंचगव्य प्यावें. स्पर्श केला तर स्नान करावें. ‘‘ब्रह्मपुराणांत’’ मघा नक्षत्रांत चंद्र व हस्त नक्षत्रांत सूर्य असून जर मघा नक्षत्र व त्रयोदशी यांचा योग होईल त्याला ‘‘कुंजरछाय’’ असें म्हणतात. जननाशौच, मृताशौच, सूर्य व चंद्र यांची ग्रहणें व कुंजर छाया यांत जो भोजन करील तो नरकाला जाईल. जो ब्राह्मण अज्ञानानें यांत एक वेळां भोजन करील त्यानें चांद्रायण करावें. हें प्रायश्चित्त ज्या जातीच्या सुतक्याचें अन्न खाल्लें असेल त्या जातीस सांगितलेलें अशौच करून त्याच्या शेवटी करावे. ‘‘तसेंच विष्णु’’---जो ब्राह्मण वगैरेंच्या सुतकांत एक वेळां जरी अन्न खाईल तरी त्यानें सुतका इतकें सुतक पाळून सुतकाच्या शेवटीं प्रायश्चित्त करावें.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP