प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ३७ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘वज्रकृच्छ्रमाहांगिराः’’ गोमूत्रेण समायुक्तं यावकं चोपयोजयेत्। एकाहेन तु कृच्छ्रोयमुक्तस्त्वंगिरसा स्वयं।
सर्व पापहरो दिव्यो नाम्ना वज्र इति स्मृत इति। ‘‘अथ तुलापुरुषकृच्छ्रः’’ ‘‘शंखः’’ पिण्याकाचामतक्रांबुसक्तूनां प्रतिवासरं।
उपवासांतराभ्यासात्तुलापुरुषउच्येते
वज्रकृच्छ्र व तुलापुरुषकृच्छ्र यांची लक्षणें.
‘‘अंगिरस्’’ वज्रकृच्छ्र सांगतो---अर्धवट शिजलेले जव गोमूत्रांत मिळवून एक दिवस खावे. हा सर्व पापांचा नाश करणारा दिव्य वज्र या नांवाचा कृच्छ्र ‘‘अंगिरसानें’’ स्वतः सांगितला आहे. ‘‘तुलापुरुषकृच्छ्र’’ ‘‘शंख’’---तिळांचा कल्क (चटणी), भाताची पेज, ताक, पाणी व सुक्त (सातु) या पांचा पैकी प्रत्येक दिवशी क्रमानें एक एक खाऊन सहाव्या दिवशीं उपास करावा. याला ‘‘तुलापुरुष’’ म्हटलें आहे.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP