प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १५७ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘चांडाल्यादीनां कामाकामयोः सकृद्गमने यमः’’ चंडालपुल्कसानां तु भुक्त्वा गत्वा च योषितं।
कृच्छ्राद्बमाचरेज्ज्ञानादज्ञानादैंदवद्वयमिति इदमेव च कुमार्यादिगमनेपि ज्ञेयं बृहद्यमयाज्ञवल्क्याद्यनेकवचनोपात्तत्वेन तुल्यधर्मत्वात् ‘‘बहूनामेक धर्माणामेकस्यापि यदुच्यते। सर्वेषां तद्भवेत्कार्यमेकरूपा हि ते स्मृता इति विज्ञानेश्र्वरादयः’’।
अकामत एकरात्राभ्यासे तु त्रैवार्षिकं ‘‘तथा च मनुः’’ यत्करोत्येकरात्रेण वृषलीसेवनाद्विजः।
तद्भेक्ष्यभुग्जपन्नित्यं त्रिभिर्वर्षैर्व्यपोहतीति वृषली चात्र चांडालीति ‘‘अपरार्कमिताक्षराकल्पतरुभवदेवीयादिषु तथा च मिताक्षरायां स्मृत्यंतरं’’ ‘‘चांडाली बंधकी वैश्या रजःस्थाया च कन्यका। ऊढा या च सगोत्रा स्याद्वृषल्यः पंचकीर्तिता इति’’ शूद्रीति शूलपाणिः स्मृत्यंतरवाक्यं त्वनाकरमिति मेने। अत्र चैकरात्रेणेत्यंततसंयोगवाचिन्या तृतीययाभ्यासोऽवगम्यते कामत एकरात्राभ्यासे तु द्विगुणम्
ज्ञानानें किंवा अज्ञानानें चांडाळ व पुल्कस यांचे खाल्ले किंवा त्यांच्या स्त्रियांशीं गमन केलें तर प्रायश्चित्त पांच प्रकारच्या वृषली.
‘‘चांडाळीण वगैरेंशी ज्ञानपूर्वक व अज्ञानपूर्वक एक वेळां गमन केलें तर त्याविषयीं. यम’’---जर चांडाळ व पुल्कस यांचें (अन्न) ज्ञानानें व अज्ञानानें खाल्लें आणि तसेंच त्यांच्या स्त्रियांशीं गमन केलें तर क्रमानें कृच्छ्राद्ब व दोन चांद्रायणें प्रायश्चित्त करावें हेंच प्रायश्चित्त कुमारी वगैरेंशीं गमन केलें तर त्याविषयी जाणावें. कारण, बृहद्यम, याज्ञवल्क्य, वगैरेंच्या पुष्कळ वचनांनीं ग्रहण केलें असल्यामुळें तुल्यधर्मत्व येते. म्हणून ‘‘एक ज्यांचा धर्म आहे अशा पुष्कळांपैकी एकाच्या संबंधानें जें सांगण्यांत येतें तें सर्वांचें कार्य (करावयास योग्य) होईल. कारण ते एकरूप सांगितलें आहेत’’ असें विज्ञानेश्र्वरादिक म्हणतात. अज्ञानानें एक दिवसाचा अभ्यास असला तर त्रैवार्षिक प्रायश्चित्त जाणावें. ‘‘त्याचप्रमाणें मनु’’---जो द्विज वृषलीच्या सेवनानें एक दिवसांत जें (पाप) करील, त्या पापाला तो भिक्षेवर निर्वाह करून दररोज गायत्री वगैरेचा तीन वर्षेपर्यंत जप करील तर नाहीसें करील. येथे वृषली म्हणजे चांडाळी समजावी. कारण अपरार्क, मिताक्षरा, कल्पतरु, व भवदेवीय वगैरेंत तसेंच सांगितलें आहे. ‘‘त्याचप्रमाणें मिताक्षरेंत दुसरी स्मृति’’ चांडाळीण, बंधकी (व्यभिचारीणी, वेश्या, रजस्वला स्त्री व लग्न झालेली आपल्या गोत्रांतील स्त्री या पाच वृषली होत शूद्री असें शूलपणि म्हणतो. दुसर्या स्मृतींतील वचन हें अनाकर होय असें त्यानें मानले. येथें ‘एक रात्रेण’ ह्या अत्यंत संयोगानें मानण्यांत येणार्या तृतीयेच्या योगानें अभ्यास जाणण्यांत येतो. बुद्धिपूर्वक एक रात्रीं अभ्यास असतां दुप्पट प्रायश्चित्त जाणावें.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP