प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १४५ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘यत्वापस्तंबः’’ स्तेयं कृत्वा सुरां पीत्वा गुरुतल्पं च गत्वा चतुर्थकालमितभोजना अपोभ्युपेयुः।
सवनानुकल्पं स्थानासनाभ्यां विहरत एते त्रिभिर्वषैः पापं नुदं तीति यद्यप्यंगिराः महापातकसंयुक्ता वर्षैः शुध्यंति ते त्रिभिरिति तदुभयं यदापहारोत्तरमेवानुतापेन स्वामिने प्रत्यर्पयति तद्विषयमिति प्रांचः अन्ये तु सुवर्णचतुर्थांशापहारविषयत्वमाहुः।
वस्तुतः सगुणविप्रस्य निर्गुणविप्रस्वामिकसुवर्णापहारविषयत्वं युक्तं। ‘‘तथा च भविष्ये’’ विप्रस्य गुणवान्विप्रो निर्गुणस्यापहृत्य च।
चतुर्थकाले भुंजानस्त्रिभिर्वर्षै र्व्यपोहतीति विषयांतरमप्युक्तं ‘‘तत्रैव’’ यदा च निर्गुणः स्वामी क्षत्रियोवैश्य एव च।
हृत्वा च ब्राह्मणो वीर तदापस्तंबभाषितं। ‘‘तत्रैव’’ क्षत्रियस्य गुणाढ्यस्य हृत्वा विप्रस्तु निर्गुणः।
चतुर्थकाले भुंजान स्त्रिभिर्वर्षैर्व्यपोहतीति इदं च वाक्यद्वयं न्यूनाधिकपारिमाण विषयत्वादविरूद्धं
गुणरहित अशा मनुष्याचें सोनें चोरलें असतां प्रायश्चित्त.
‘‘जें तर आपस्तंब’’ सोन्याची चोरी करणारा, मद्य पिणारा व गुरूच्या स्त्रीशीं गमन करणारा ह्यांनीं चवथ्या काळीं मित भोजन करून सवनाचा जसा प्रकार असेल त्याप्रमाणें स्नान करावें, आणि स्थान व आसन यांच्या योगानें विहार करावा याप्रमाणें तीन वर्षें केलें असतां यांचीं पातकें नाहींशीं होतात. ‘‘जेंही अंगिरस्’’ महापातकानें युक्त जे असतील ते तीन वर्षांनीं शुद्ध होतील’’ असें म्हणतो. हीं दोन्ही वाक्यें जेंव्हां चौर्या नंतर चोरी करणारास अनुताप होऊन तो मालकास तें अर्पण करील त्याविषयीं हें असावें असें ‘‘प्रांच’’ म्हणतात. ‘‘दुसरे’’ तर चतुर्थांश अशा सोन्याच्या चोरी विषयीं असावें असें म्हणतात. वास्तविक गुणवान् अशा ब्राह्मणास गुणरहित अशा ब्राह्मण जातीच्या मालकाच्या सोन्याच्या चोरी विषयीं (हें प्रायश्चित्त) योग्य दिसते. ‘‘तसेंच भविष्यपुराणांत’’ जर गुणवान् असा ब्राह्मण निर्गुण अशा ब्राह्मणाच्या सोन्याची चोरी करील, तर त्यानें तीन वर्षें पावेंतों चवथ्या काळी भोजन करावें म्हणजे तो मुक्त होईल. ‘‘विषयांतर ही त्यांतच सांगितलें आहे’’ जेव्हां निर्गुण असा क्षत्रिय किंवा वैश्य अशा मालकाचें सोनें ब्राह्मण चोरील, तेव्हां त्यानें आपस्तंबानें सांगितलेलें प्रायश्चित्त करावे. ‘‘त्यांतच’’ जर गुणवान् अशा क्षत्रियाचें सोनें निर्गुण असा ब्राह्मण चोरील, तर त्यानें तीन वर्षें पर्यंत चवथ्या काळीं भोजन करावें म्हणजे तो शुद्ध होईल. ही दोन्ही वचनें कमी व जास्ती परिमाणाविषयीं असल्यामुळें विरूद्ध नाहीत.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP