मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त ९८ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ९८ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

‘‘कामतः सकृत्‍पाने पराशरः’’ मद्यपश्र्च द्विजः कुर्यात्‌ नदीं गत्‍वा समुद्रगां। चांद्रायणे ततश्र्चीर्णे कुर्यात्‌ ब्राह्मणभोजनं।
अनुडुत्‍साहितां गां च दद्याद्विप्रेषु दक्षिणां। इदं गवाधिक्‍यं शक्तं प्रति।
‘‘अज्ञानतः सकृत्‍पाने तु विष्‍णुबृहस्‍पती’’ पीत्‍वा प्रमादतो मद्यमतिकृच्छ्रं चरेद्विजः। कारयेत्तस्‍य संस्‍कारं भक्त्‍या विप्रांश्र्च भोजयेत्‌

बुद्धिपूर्वक व अबुद्धिपूर्वक मद्यपान केलें तर प्रायश्चित्त.

‘‘बुद्धिपूर्वक एकदां पान केलें तर त्‍याविषयी पराशर’’---मद्यपान करणार्‍या द्विजानें समुद्रास मिळणार्‍या नदीस जाऊन तेथें चांद्रायण करावें. त्‍याची समाप्ति झाल्‍यानंतर ब्राह्मणभोजन करावें, नंतर ब्राह्मणास बैलासह एक गाय दक्षिणा द्यावी. हे जे गाय व बैल जास्‍त सांगण्यांत आले ते ज्‍याला सामर्थ्य आहे त्‍याला सांगितलें. ‘‘अज्ञानानें एकदां पान केलें तर त्‍याविषयीं विष्‍णु व बृहस्‍पति’’---जो द्विज अज्ञानानें मद्यपान करील, त्‍यानें अतिकृच्छ्र करावें, व आपला पुन्हा संस्‍कार करवून भक्तीनें ब्राह्मणांस जेऊं घालावें.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP