प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ११० वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
अथ क्रियादुष्टभक्षणे.
‘‘तत्रोच्छिष्टभक्षणे मनुः’’ बिडालकाकाखूच्छिष्टं जग्ध्वा श्र्वनकुलस्य च’ केशकीटावपन्नं च पिबेद्ब्राम्हीं सुवर्चलां पानं त्वेकस्मिन्नेव दिने एतच्चाकामतः सकृद्भक्षणे। ‘‘कामतस्तु विष्णुः’’ पक्षिश्र्वापदजग्धस्य रसस्यान्नस्य भूयसः। संस्काररहितस्यापि भोजनेकृच्छ्रपादकं। ‘‘अकामतोऽभासे शातातपः’’ श्र्वाकाकावलीढशूद्रोच्छेषणभोजने त्वतिकृच्छ्र इति।
‘‘कामतोऽभ्यासे यावकव्रतं प्रकृत्य शंखः’’ शुनामुच्छिष्टकं भुक्त्वा मासमेकं व्रती भवेत्।
काकोच्छिष्टं गावाघ्रातं भुक्त्वा पक्षं व्रती भवेत्
क्रियेनें दुष्ट झालेल्या अन्नादिकांच्या भक्षणाविषयीं.
मांजर, कावळा, उंदीर वगैरेंनी उष्टे केलेलें अन्न खाल्ले तर प्रायश्चित्त.
‘‘त्यांत उष्ट्याच्या भक्षणाविषयीं मनु’’---मांजर, कावळा, उंदीर, कुत्रें व मुंगुस यांनी उष्टें केलेलें अन्न खाल्लें असतां तसेंच केस व किडे पडलेलें अन्न खाल्लें असतां एक दिवस अति तेजस्वी अशा ब्राम्हीचें पान करावें (रस प्यावा) हें अज्ञानानें एक वेळां भक्षण केलें असतां त्या विषयी जाणावें. ‘‘बुद्धिपूर्वक तर विष्णु’’---संस्कारानें रहित अशा पक्षि व श्र्वापद यांनी खाल्लेल्या पुष्कळ अशा अन्नाच्या रसाचें भोजन केलें तर कृच्छ्रापाद प्रायश्चित्त करावें. ‘‘अज्ञानानें अभ्यास असतां शातातप’’---कुत्रें व कावळा यांनी खाल्लेलें व शूद्राचें उष्टें (अन्न) यांचें भोजन केलें असतां अतिकृच्छ्र करावा. ‘‘बुद्धिपूर्वक अभ्यास असतां यावक व्रतास उपक्रम करून शंख’’---कुत्र्यांनीं उष्टें केलेलें (अन्न) भक्षण केलें तर एक महिनापर्यंत व्रत करावें. कावळ्याचें उष्टें व गाय व बैल यांचें उष्टें (अन्न) खाल्लें असतां पंधरा दिवस पर्यंत व्रत करावे.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP