प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १३ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘भविष्ये’’ पुत्रं शिष्यं तथा भार्यां शासतश्र्चेत्प्रणश्यति।
न शास्ता तत्र दोषेण लिप्यते राजसत्तम।
इदं च पुत्रादीनुपक्रम्य ‘प्राप्तापराधास्ताड्याः स्यूरज्वा वेणुदलेन वा।
अतोऽन्यथा तु प्रहरन् चोरस्याप्नोति किल्बिषमिति मनूक्तायां शास्तौ ज्ञेयं’ अधिक शासने तु दोष एव
पुत्र वगैरेस शिक्षा करतांना मरण आले असतां त्याविषयी विचार.
‘‘भविष्यांत’ हे राजश्रेष्ठा ! पुत्र, शिष्य व स्त्री यांस शिक्षा करतांना जर ते प्राणास मुकतील तर शिक्षा करणारा दोषी होत नाही. हें पुत्रादिकांस आरंभ करून ‘‘ज्यांच्याकडून अपराध झाले असतील त्यांस दोरीनें किंवा वेळूच्या तुकड्यानें (काठीनें) पाठीवर मारावे. मस्तकावर किंवा छातीवर मारूं नये. या वाचून चोराच्या शरीराच्या दुसर्या भागावर मारलें असतां मारणारास पातक लागतें’’ असें जें मनूनें सांगितलेलें शासन (शिक्षा) त्या विषयीं जाणावे. अधिक शासनाविषयी दोष आहेच.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP