प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १३६ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘यमः’’ गुडादिद्रव्यसंयुक्तं वर्ज्य पर्युषितं दधि। तथैव यावकादीनि मंथादिरचितान्यपि।
‘‘अत्र प्रायश्चित्तं ब्रह्मपुराणे’’ सगुडं न विशुद्धं च तथा पर्युषितं दधि। दीर्ण तक्रमपेयं च नष्टस्वादं च फेणवत्।
प्रमादाद्भक्षितैरेभिर्वने पक्षव्रतं चरेत्। भुक्त्वा तु क्षारलवणं त्रिरात्रं तु वने वसेत्।
सगुडं मरिचाक्तं च वर्ज्य पर्युषितं दधीति मदनः पपाठ
गुळ वगैरे पदार्थांनीं मिश्र केलेलें असें दहि वर्ज्य करावें त्याविषयीं प्रायश्चित्त.
‘‘यम’’---गुळ वगैरे पदार्थांनी मिश्र केलेलें, तसेंच शिळें झालेलें दहि वर्ज्य करावें. तसेंच मंथ वगैरेंच्या योगानें बनविलेली यावक इत्यादि वर्ज्य करावी. ‘‘याविषयीं ब्रह्मपुराणांत प्रायश्चित्त’’ गुळानें युक्त असलेलें, स्वच्छ नसलेलें तसेंच शिळें असें दहि, आणि पिण्यास अयोग्य, ज्याचा स्वाद गेलेला, फेंसानें युक्त व भिन्न भिन्न झालेलें (चिथड्या प्रमाणें झालेलें) असें ताक ही अज्ञानानें खाल्लीं असतां रानांत एक पक्षपर्यंत व्रत करावें. क्षारलवण खाल्लें असतां तीन दिवसपर्यंत वनांत रहावें. ‘‘सगुडं न विशुद्धं च’’ याच्या ऐवजीं ‘‘सगुडं मारिचाक्तं च वर्ज्यं पर्युषितं दधि ‘‘असा मदनपाठ करतो.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP