प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ७२ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘आपस्तंबः’’ अस्थिभंगं गवां कृत्वा लांगूलछेदनं तथा। पाटनं दंतशृंगाभ्यां मासार्धं तु यवान्पिबेदिति एतत्कामतः।
‘‘अकामतस्तु अंगिराः’’ शृंगभंगेऽस्थिभंगे वा चर्मनिर्मोचनेऽपि वा। दशरात्रं पिबेद्वज्रं स्वस्थापि यदि गौर्भवेदिति।
‘‘पराशरः’’ पाषाणेनैवदंडेन गावोयेनाभिघातिताः। शृंगभंगे चरेत्पादं द्वौ पादौ नेत्रघातने। लांगूले पादकृच्छ्रं तु द्वौ पादास्थि भंजने।
त्रिपादं चैवकर्णे तु चरेत्सर्वं निपातन इति ‘स एव’ श्रृंगभंगेऽस्थिभंगे च कटिभंगे तथैव च।
यदि जीवति षण्मासात्प्रायश्चित्तं न विद्यत इति ‘व्यासः। यवसंचोपहर्तव्यं यावद्रोहेततद्व्रणं।
संपूर्णे दक्षिणां दद्या ततः प्रापात्प्रमुच्यते ‘पराशरः’ यद्यसंपूर्ण सर्वांगो हीनदेहो भवेत्तदो। गोघातकस्य तस्यार्धं प्रायश्चित्तं विनिर्दिशेत्
गाईचें हाड मोडणें, शेंपूट तोडणें, दांत उपटणें वगैरे केले असतां प्रायश्चित्त.
‘आपस्तंब’---गाईचें हाड मोडलें, शेंपूट तोडलें, किंवा दांत व शिंगें उपलटली तर पंधरा दिवस पावेतों यव खावें हें (वचन) बुद्धिपूर्वक करणार्या विषयीं जाणावें. अबुद्धिपूर्वक केलें तर त्याविषयीं ‘अंगिरस्’---गाईचें शिंग मोडणें, हाडूक मोडणें किंवा चामडें काढणें ही केली असतां जरी पुढें ती बरी झाली तरी दहा दिवस पावेंतों दुध इत्यादि प्यावें. ‘पराशर’---दगडानें किंवा काठीनें गाईस मारून जर तिचें शिंग मोडले तर एक पाद, डोळा फोडला तर दोन पाद, शेंपूट तोडलें तर पादकृच्छ्र, हाड मोडलें तर दोन पाद, कान तोडला तर तीन पाद व निपातन केलें तर सर्व (प्राजापत्य) प्रायश्चित्त करावे. ‘तोच’---गाईचें शिंग मोडलें असतां, हाड मोडलें असतां किंवा कमर मोडली असतां ती पुढें सहा महिने पावेतों जर वाचेल तर प्रायश्चित्त नाही. ‘व्यास’---जों पावेंतों गाईचा व्रण भरून येईल तों पावेंतों घास घालावा. व्रण पूर्ण झाल्यानंतर दक्षिणा द्यावी म्हणजे तो पापापासून मुक्त होईल. ‘‘पराशर’’---जर गाईस मारल्यानें तिचा एखादा अवयव कमी होऊन ती हीन देह होईल तर त्याला गाईच्या वधाचें अर्धें प्रायश्चित्त सांगावे.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP