प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ९३ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
अथ सुरापाने
सुरा पैष्ठ्यैव। ‘‘सुरा वै मलमान्नानां पाप्मा च मलमुच्यते। तस्माद्ब्राम्हणराजन्यौ वैश्यश्र्च न सुरां पिबेदिति मनुक्तेः’’।
गौडी माध्वी च पैष्ठी च विज्ञेया त्रिविधा सुरा। यथैवैका तथैवान्या न पातव्या द्विजोत्तमैरिति तु तदुक्तिः समदोषतयेतरनिंदार्था।
‘‘अत एव भविष्यत्पुराणे’’ सुरा तु पैष्ठी विज्ञेया न तस्यास्त्वितरे समे इति। ‘‘पुलस्त्योऽपि’’ पानसं द्राक्षमाधुकं खार्जूरं तालमैक्षवं। मधूत्थं सैरमारिष्टमैरयं नारिकेलजं समानानि विजानीयान्मद्यान्येकादशैव तु। द्वादशं तु सुरामद्यं सर्वेषामधमं स्मृतमिति।
द्वादशापि मद्यानि विप्रस्य निषिध्दानि ‘‘नित्यं मद्यं ब्राह्मणोवर्जयेदिति स्मृतेः’’ सुरा तु क्षत्रियविशोरपि पूर्वोक्तमनूक्तेः
सुरापानाविषयीं.
सुरापानाचा निषेध. सुरेचे गौडी इत्यादि तीन प्रकार, व बारा प्रकारची मद्ये.
सुरा म्हणजे पैष्ठीच. कारण, ‘‘सुरा ही अन्नांचा मळ आहे असें म्हटलें आहे आणि पापासही मळ असें म्हटलें आहे. म्हणून ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य यांनी सुरा पिऊं नये’’ असें मनूचें वचन आहे. ‘‘गौडी, माध्वी व पैष्ठी अशी तीन प्रकारची सुरा जाणावी. जशी पहिली तशीच दुसरी, म्हणून द्विज श्रेष्ठांनीं ती पिऊं नये.’’ असें जें तिचेविषयी म्हणणें आहे, ते सारखा दोष असल्यामुळें दुसरीच्या निंदेबद्दल आहे. म्हणूनच ‘‘भविष्यपुराणांत’’ सुरा म्हणजे पैष्ठीच जाणावी. दुसर्या (माध्वी व गौडी) तिच्या सारख्या नाहीत. ‘‘पुलस्त्यही’’---‘‘पानस, द्रौक्ष, माधूक, खार्जूर, ताल ऐक्षव, मधूत्थ, सैर, अरिष्ट, मैरेय व नारिकेलज’’ ही अकरा मद्यें सारखीं जाणावी. बारावें सुरा हें मद्य सर्वांमध्ये अधम गणलेलें आहे. बाराही मद्यें ब्राह्मणास निषिद्ध आहेत. कारण, ‘‘ब्राह्मणानें मद्य अवश्य वर्ज्य करावें’’ अशी स्मृति आहे. सुरा तर पूर्वीं सांगितलेल्या मनूच्या वचनावरून क्षत्रिय व वैश्य यांसही वर्ज्य आहे.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP