‘‘योगीश्र्वरः’’ वसेत्स नरके घोरे दिनानि पशुरोमभिः। संमितानि दुराचारोयोहंत्यविधिना पशून्।
‘‘हंतृनाह मनुः’’ अनुमंता विशसिता निहंता क्रयविक्रयी। संस्कर्ता चोपहर्ताच खादकश्र्चेति घातकाः।
अत्र देवान्पितृनिति सामान्यतोऽनुज्ञातमप्यजादिमांसं विप्रेण न भक्ष्यं। ‘‘तथाच मनुः’’ यक्षरक्षःपिशाचान्नं मद्यं मांसं सुरासवं।
तद्ब्राह्मणेन नात्तव्यं देवानामश्र्नता हविः।
यत्तु मेधातिथिः निषिद्धमांसपरमेतदित्याह तन्न विशेषनिषेधे वैय्यर्थ्यापत्तेः न चायंदोषातिशयार्थः।
यस्य हि निषेधस्य निषिद्धविषयत्वमेव नियतं। तत्रानिषिद्ध विषयालाभादगत्या दोषविशेषः कल्प्यते।
यथा नंदासु अभ्यंगनिषेधे सति पुनः षष्ठ्यां निषेधो दोषातिशयार्थः। केचित्तु मांसरललोलुपा अपक्कमांसविषयत्वमास्याहुः।
उपक्रमे यक्षरक्षःपिशाचान्नमित्युक्तेः यक्षादीनां च क्रव्यादत्वादपक्कमेव मासामन्नं।
तथोपसंहारेपि देवानामश्र्नतां हविरित्युक्तेः।
देवानां च हविः पक्कमेव भवति। अतः पक्कमेव विप्रैर्भक्ष्यं नापक्कमिति।
तत्तुच्छं न हि यक्षादयः पक्कं नाश्र्नंति क्रव्यात्वं तु तेषां पक्कालाभे अपक्कमप्यश्र्नंतीत्यभिप्रायेण देवानां हविश्र्चाममपि विहितं यथाग्निहोत्रे तंडुलैर्जुहोतीति चित्रायां च दधिमधुघृतं धाना उदकं तंडुलास्तत्संसृष्टं प्राजापत्यमिति।
तथा पर्यग्निकृतानारण्यानृत्सृजतेत्यत्र पशुरूपाममांसस्यैव देवतासंबंधउक्तः। तस्मादुपक्रमोमांसमात्रनिंदार्थ एव उपसंहारोऽपि ब्राह्मणस्तुत्यर्थ एव अत्र विशेषः श्रीपितृकृते द्वैतनिर्णये द्रष्टव्यः
जो अविधीनें पशूंस मारतो तो नरकांत पडतो. सात प्रकारचे घातक. साधारणतः मांस खाण्यास परवानगी आहे तथापि बकरी इत्यादिकांचें मांस ब्राह्मणानें खाऊं नये.
‘‘याज्ञवल्क्य’’---जो अविधीनें पशूंस मारतो तो पशूंच्या शरीरावर जेवढें केंस असतील तितके दिवस पर्यंत भयंकर अशा नरकांत वास करील. ‘‘मनु हंते (हत्त्या करणारे) सांगतो---परवानगी देणारा, ठार मारणारा, मारून टाकणारा, क्रयविक्रय करणारा, शिजविणारा, भेट देणारा व खाणारा हे घातक होत. येथे ‘‘देवान्पितृन्’’ या वचनावरून साधारणपणे मांसाची आज्ञा केली आहे, तथापि बकरें इत्यादिकांचें मांस ब्राह्मणानें खाऊं नये. ‘‘तसेंच मनु’’---यक्ष, राक्षस व पिशाच यांचें अन्न, मद्य, मांस, सुरा व आसव हें देवांच्या हवीचें भक्षण करणार्या ब्राह्मणानें खाऊं नये. ‘‘जें तर मेधातिथि’’ हें निषिद्ध मांसाविषयीं आहे असें म्हणतो, तं बराबर नाही. कारण विशेष निषेधाविषयी वैय्यर्थ्यापत्ति येते, आणि हा (निषेध) दोषाच्या अतिशया करितां नाही. ज्या निषेधाचें निषिद्ध विषयत्व हेंच निश्चित्त आहे, तेथें अनिषिद्धाच्या विषयाची व्याप्ति नसल्यानें नाइलाजानें दोषाचा विशेष कल्पिण्यांत येतो. जसें की प्रतिपदा, षष्ठी व एकादशी या नंदासंज्ञक तिथि आहेत, या तिथींत अभ्यंगाचा निषेध असून पुन्हा षष्ठींत निषेध आहे, तो दोषाच्या अतिशयाकरितां आहे. मांसाच्या रसाविषयीं लुब्ध असणारें असे कित्येक तर हें कच्च्या मांसाविषयी आहे असें म्हणतात. कारण वचनाच्या आरंभी ‘‘यक्षरक्षः’ पिशाचान्नं०’’ या वचनावरून यक्षादिक हे मांस खाणारे असल्यामुळें कच्चे असेंच मांस त्यांचें अन्न होय. तसेंच शेवटी ही ‘‘देवानामश्र्नता हविः’’ या वचनावरून देवांचें हवि शिजलेलेंच असते. म्हणून ब्राह्मणांनीं शिजलेलेंच (मांस) खावें, कच्चें मांस खाऊं नये.’’ असे म्हणतात, तें तुच्छ होय. कारण यक्षादिक पक्कें (मांस) खात नाहींत असें नाही. त्यांस क्रव्यात्व (मांस खाणें) असें जें म्हटलें आहे तें पक्व न मिळाल्यास कच्चेंही खातात या अभिप्रायानें आहे देवांस हवि कच्चेंही विहित आहे. जसें की ‘‘अग्निहोत्रे तंडुलैर्जुहोति’’ यावरून अग्निहोत्रांत कच्च्या तांदुळांचा ‘‘चित्रायां च दधि मधुघृतं धाना उदकं तंडुलास्तत्संसृष्टं प्राजापत्यं’’ यावरून चित्रानक्षत्रांत दहि, मध, तूप, लाह्या, पाणी व तांदुळ यांचा तसेंच ‘‘पर्यग्निकृतानारण्यानुत्सृजत’’ या ठिकाणीहीं पशुरूप अशा कच्च्या मांसाचाच देवतेशी संबंध सांगितला. त्यावरून आरंभ (यक्षरक्षःपि०) केवळ मांसाच्या निंदेकरितांच आहे. उपसंहारही (देवानामश्र्नता हविः) ब्राम्हणाच्या स्तुति करितांच आहे. याविषयी विशेष आमच्या वडलांनी केलेल्या द्वेतनिर्णयांत पहावा.