प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ९१ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘ उर्ध्वोच्छिष्टादिमरणे पराशरांगिरसौ’’ ऊर्ध्वोच्छिष्टे ह्यधोच्छिष्टे ह्यंतरिक्षे मृतिर्यदि। कृच्छ्रत्रयं प्रकृर्वीत आशौचिमरणेऽपि च।
‘‘तथा’’ ऊर्ध्वोच्छिष्टे ह्यधोच्छिष्टोभयोच्छिष्टे तथैवच। अस्पृश्यस्पर्शमरणे खट्वादौ मरणे तथा।
श्र्वानक्रव्यादसंस्पर्शे कृमिकीटोद्भवेऽपि च। एतद्दाषानुसारेण प्रायःश्चित्तं समाचरेत्।
कृच्छ्रास्त्रिषट्पंचदश चांद्रायणमथापि वेति शक्त्या कृच्छ्रादिव्यवस्था
उर्ध्वोच्छिष्ट वगैरेंचे मरण झालें तर प्रायश्चित्त.
‘‘उर्ध्वोच्छिष्टादिकांच्या मरणाविषयी ‘‘पराशर व अंगिरस्’’ उर्ध्वोच्छिष्ट असतां किंवा अधोच्छिष्ट असतां मरण झालें किंवा अंतरिक्षांत मरण झालें किंवा सूतकांत मरण झालें तर तीन कृच्छ्र प्रायश्चित्त करावे. ‘‘तसेंच’’ उर्ध्वोच्छिष्ट असतां, अधोच्छिष्ट असतां, किंवा उभयोच्छिष्ट असतां मरण झालें अथवा अंत्यजादिकांचा स्पर्श होऊन मरणें झालें किंवा खाट इत्यादिकांवर मरण झालें किंवा कुत्रें व मांस खाणारा प्राणी यांचा स्पर्श झाला अथवा कृमि, कीट यांचा उद्भव झाला तर जसा दोष असेल त्या प्रमाणें तीन, सहा व पंधरा कृच्छें किंवा चांद्रायण प्रायश्चित्त करावें. शक्तीप्रमाणें कृच्छ्रादिकांची व्यवस्था करावी.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP