प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १५५ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘प्रायश्चित्तांतरमहांगिराः’’ महाव्रतं चरेद्वापि दद्यात्सर्वस्वमेव चेति। ‘‘व्यभिचारितायां सवर्णायां मातरि सकृद्गमने तु ‘‘योगी’’ चांद्रायणं वा त्रीन्मासानभ्यसन् वेदसंहितामिति। गर्भोत्पत्तौ त्वेतान्येव प्रायश्चित्तानि द्विगुणानि। गमने यद्व्रंतं प्रोक्तं गर्भे तद्विगणं भवेदित्युशनोवाक्यात् गमनावृत्तापि प्रायश्चित्तावृत्तिः।
‘‘कामतोजनन्यतिरिक्तगुरुभार्यागमने तु ‘‘याज्ञवल्क्यः’’ तप्तेऽयः शयने सार्धमायस्या योषिता स्वपेत्। तप्ते तप्ते शरीरदाहक्षमे ‘‘मनुरपि’’ स्वयं वा शिस्नवृषणावृत्कृत्याधाय चांजलौ। नैॠतिं दिशमातिष्ठेदानिपातादजिम्हगइति आतिष्ठे द्गच्छेत् निपातोमरणं अयेमेव च दंडः आसामन्यातमां गच्छन् गुरुतल्पग उच्यते। शिस्नस्योत्कर्तनातत्र नान्योदंडोविधीयत इति नारदोक्तेः।
जनन्यामकामतोऽपि गमने एतदेव मरणांतं प्रायश्चित्तद्वयं बोध्यम्।
‘‘जनन्यां कामतस्तु वसिष्ठः’’ निष्कालकोघृताक्तोगोमयाग्निना पादप्रभृत्यात्मानमवदाहयेदिति शिरस्यवस्थिताः कालकाः केशा अस्मादसौ निष्कालकः मुंडितशिरा इत्यर्थः अभ्यासे गर्भोत्पत्तौ चेदमेवान्यानुक्तेः एतानि च प्रायश्चित्तान्यौरसपुत्रस्यैव दत्तकादीनां न्यूनं कल्प्यमिति निबंधकृतः जनन्यां कामतः प्रवृतस्य रेतः सेकदार्वाङ्निवृत्तौ द्वादशाद्बं अकामतः षडद्बं तत्सपत्न्यां कामतः षडद्बं अकामतस्तदर्धमित्यादि कल्प्यम्
‘‘शूद्रस्य विप्रागमने तु प्रचेताः’’ शूद्रस्य ब्राह्मणीं मोहाद्गच्छतः शुद्धिमिचछतः। पूर्णमेव व्रतं देयं माता यस्माद्धि तस्य सेति ‘‘गुरुपभुक्तास्वपि साधारणस्त्रीषु गमने गुरुतल्पदोषोनास्तीत्याह व्याघ्रपादः’’ जात्युक्तं पारदार्यं च कन्यादूषणमेव च। साधारणस्त्रियोनास्ति गुरुतल्पत्वमेव चेति साधारणस्त्री वेश्या
व्यभिचारी अशा सवर्ण मातेशीं गमन घडलें असतां व गर्भ राहिला असतां प्रायश्चित्त. बुद्धिपूर्वक बापाच्या स्त्रीशीं गमन केलें तर प्रायश्चित्त. जननीशीं बुद्धिपूर्वक व अबुद्धिपूर्वक गमन केले तर प्रायश्चित्त.
‘‘अंगिरस्’’ दुसरें प्रायश्चित्त सांगतो’’---मोठें व्रत करावें किंवा सगळी मिळकत द्यावी. ‘‘व्यभिचारी अशा एका जातीच्या मातेच्या ठिकाणीं एक वेळां गमन केलें तर त्याविषयीं योगी’’---चांद्रायण करावें किंवा तीन महिनेपर्यंत वेदाच्या संहितेचें पारायण करावें. गर्भ राहिला तर हींच प्रायश्चित्तें दुप्पट करावीं. कारण, ‘‘गमनाविषयीं जें व्रत सांगितलें तेंच गर्भाविषयीं दुप्प्ट जाणावें’’ असें उशनसाचें वाक्य वाक्य आहे. गमनाची आवृत्ति झाली तर प्रायश्चित्ताची ही आवृत्ति करावी. ‘‘बुद्धिपूर्वक जननीवाचून बापाच्या स्त्रियेविषयी गमन केलें तर त्याविषयीं याज्ञवल्क्य’’---शरीर जळेल अशा तापलेल्या लोखंडाच्या बिछान्यावर लोखंडाच्या स्त्रीबरोबर निजावे. ‘‘मनु ही’’---अथवा स्वतः शिश्र्न व अंड हे उपटून आपल्या ओजळींत घेऊन मरण येईल तोपर्यंत नैॠति दिशेकडे चालत जावें, हाच दंड जाणावा. कारण, यां पैकी एकीशीं गमन करणारा तो ‘गुरुतल्पग’ म्हणण्यांत येतो. त्याला शिस्न कापणें यावाचून दुसरा दंड करण्यांत येत नाहीं’’ असें नारदाचें वचन आहे. जननीशीं अज्ञानपूर्वक गमन केलें तर हीच मरण येईपावेंतों दोन प्रायश्चित्ते जाणावी. ‘‘जननीशीं बुद्धिपूर्वक गमन केलें तर वसिष्ठ’’---आपल्या डोकीवरील केस काढवून सर्व अंगास तूप माखून शेण्यांच्या अग्नीनें पायापासून आपणास जाळून घ्यावे. अभ्यासाविषयीं व गर्भाच्या उत्पत्तिविषयीं दुसरें प्रायश्चित्त सांगितलें नाहीं म्हणून हेंच प्रायश्चित्त जाणावें. हीं प्रायश्चित्तें औरस पुत्रासच जाणावी. दत्तकादिकांस कमी मानावें. असें निबंधकार म्हणतात. जननीशी बुद्धिपूर्वक प्रवृत्त झालेल्यास रेत पडण्याच्या पूर्वी निवृत्ति झाली तर द्वादशाद्ब. अबुद्धिपूर्वक षडद्ब प्रायश्चित्त. जननीच्या सवतीशी बुद्धिपूर्वक गमनाविषयीं षडद्ब, अबुद्धिपूर्वक त्रद्ब, इत्यादि कल्पना करावी.
शूद्रानें ब्राह्मणीशीं गमन केलें तर प्रायश्चित्त. बापानें ज्यांचा उपभोग केला आहे अशा साधारण स्त्रियांशीं गमन केलें तर.
‘‘शूद्रानें ब्राह्मणीशी गमन केलें तर त्याविषयीं प्रचेतस्’’---अज्ञानानें ब्राह्मणीशीं गमन करणारा शूद्र जर शुद्धीची इच्छा करील, तर त्याला पूर्ण प्रायश्चित्त द्यावे. कारण, ती त्याची माता आहे. ‘‘बापानें ज्यांचा उपभोग केला आहे अशा साधारण स्त्रियांशीं गमन घडलें तर त्याविषयीं गुरुतल्पदोष नाहीं असें व्याघ्रपाद म्हणतो’’---जाती संबंधानें सांगितलेलें पारदार्य, कन्येचें दूषण व वेश्या यांस गुरुतल्पत्व नाहीं.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP