प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १२४ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘अथ रजकाद्यन्ने आपस्तंबः’’ रजकव्याधशैलूषवेणुचर्मोपजीविनां। योभुंक्ते ब्राह्मणश्र्चान्नं शुद्धिश्र्चांद्रायणेन तु।
एतत्कामतः अकामतोऽर्धं। ‘‘यत्तु रजकादीनभिधायाह यमः’’ भुक्त्वा चैषां स्त्रियोगत्वा पीत्वापः प्रतिगृह्य च।
कृच्छ्राद्बमाचरेत् ज्ञानादज्ञानादैंदवद्वयमिति एतदभ्यासे। ‘‘यत्तु संवर्तः’’ अंत्यजान्नं यदा भुंक्ते शूद्रोमोहात्कथंचन।
एकरात्रोषितोभूत्वा दानं दत्वा विशुध्यति तदापदि। ‘‘अथकापिलान्ने आपस्तंबः’’ कापालिकान्नभोक्तृणां तन्नारीगामिनां तथा।
ज्ञानात्कृच्छ्राद्बमुद्दिष्टमज्ञानादैंदवद्वयं कृच्छ्राद्बमभ्यासविषयम्
परीट, व्याघ्र, कापालिक इत्यादिकांचें अन्न ब्राह्मणानें खाल्लें तर प्रायश्चित्त.
‘‘परीट इत्यादिकांच्या अन्नाविषयी आपस्तंब’’---परीट, व्याध, नट, बुरुड व चांभार यांचें अन्न जो ब्राह्मण खाईल त्याची चांद्रायणानें शुद्धि होईल. हें (प्रायश्चित्त) ज्ञानपूर्वकाविषयीं जाणावें. अज्ञानाविषयीं तर अर्धें (प्रायश्चित्त). ‘‘जें तर यम परीट इत्यादिकांस सांगून म्हणतो’’---जर जाणून यांचें अन्न खाल्लें, यांच्या स्त्रियांशी गमन केले, यांचें पाणी प्यालें व यांच्या पासून दान घेतले तर कृच्छ्राद्ब प्रायश्चित्त करावे. अज्ञानानें पूर्वोक्त कृत्यें घडलीं तर दोन चांद्रायणें करावी’’ तें अभ्यासाविषयीं जाणावे. ‘‘जें तर संवर्त’’ ‘‘जर एखादा शूद्र अज्ञानानें कदाचित् अंत्यजाचें अन्न खाईल तर त्यानें एक दिवस उपास करून दान द्यावें म्हणजे शुद्ध होईल’’ असें म्हणतो तें संकटाविषयीं जाणावे. ‘‘कापिलाच्या अन्नाविषयी आपस्तंब (सांगतो)’’---बुद्धिपूर्वक कापालिकांचें अन्न खाणारांस तसेंच त्यांच्या स्त्रियांशीं गमन करणारांस कृच्छ्राद्ब (तीस कृच्छ्र) प्रायश्चित्त सांगितलें. अज्ञानानें पूर्वोक्त कर्म करणारास दोन चांद्रायणें प्रायश्चित्त सांगितलें. कृच्छ्राद्ब प्रायश्चित्त अभ्यासाविषयीं जाणावे.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP