मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त १५८ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १५८ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

‘‘माधवीये व्याघ्रः’’ आश्रितस्‍यापि विदुष आहिताग्‍नेश्र्च योषितः। आचार्यस्‍य च राज्ञश्र्च भ्रार्यां प्रव्रजितां तथा।
धात्रीं पुत्रीं च पौत्रीं च सखीं मातुस्‍तथैव च। पितुः सखीं तथा गत्‍वा गुरुतल्‍पव्रतं चरेत्‌ एकरात्रादूर्ध्वं कामतोऽत्‍यंताभ्‍यासपरमिदं।
अस्‍मिन्नेव विषये ‘‘मनुः’’ चंडालांत्‍यस्त्रियोगत्‍वा भुक्‍त्‍वा च प्रतिगृह्य च पतत्‍यज्ञानतो विप्रो ज्ञानात्‍साम्‍यं तु गच्छतीति अत्राज्ञानान्नवाब्‍दं ज्ञानतो मरणं ‘‘जनन्यां च भगिन्यां च स्‍वसुतायां तथैव च। स्‍नुषायां गमनं चैव विज्ञेयमतिपातकं।
अतिपातकिनस्‍त्‍वेते प्रविशेयु र्हुताशनं। न ह्यन्या निष्‍कृतिस्‍तेषां विद्यते हि कथंचनेति ‘‘कात्‍यायनोक्तेः’’ ‘‘वृद्धहारीतोऽपि’’ मातृदुहितृभगिनीस्‍नुषागमनान्यतिपातकानि सद्योऽग्‍निप्रवेशोऽतिपातकिनामिति ‘‘संवर्तः’’ मातरं यदि गच्छेत्तु स्‍वस्‍नुषां पुरुषाधमः।
न तस्‍य निष्‍कृतिं विंद्यात्‍स्‍वकांदुहितरं तथेति। ‘‘भ्रातृभार्यागमने संवर्तः’’ पितृव्यभार्या गमने भ्रातृभार्यागमने तथा।
गुरुतल्‍पव्रतं कुर्यान्नान्या निष्‍कृति रुच्यत इति एतच्चाकामतो बहुकालाभ्‍यासविषयं कामतस्‍तु मरणांतिकमेव ‘‘यत्तु याज्ञवल्‍क्‍यः’’ अनियुक्तो भ्रातृजायां गच्छंश्र्चांद्रायणं चरेत्‌ इति तदसवर्णव्यभिचरितभ्रातृजाया विषयमिति।
‘‘कनिष्‍ठभ्रातुर्भार्यागमने चतुर्विंशतिमते’’ भ्रातुश्र्चैव कनिष्‍ठस्‍य भार्यां गत्‍वा तु कामतः।
कृच्छ्रद्वयं सांतपनं प्रकुर्वीताथवापिवेति ‘‘आचार्यभार्यागमने जातूकर्ण्यः’’ आचार्यादेस्‍तु भार्यासु गुरुतल्‍पव्रतं चरेत्‌ आदिपदा हुपाध्यायादीनां ग्रहणं ‘‘यत्तु चतुर्विंशतिमते’’ चरेच्चांद्रायणं विप्रो गत्‍वोपाध्याययोषितं।
आचार्यस्‍य पराकं तु बौधायनवचोयथेति तव्द्यभिचरितोपाध्यायादिपत्‍नीपरं

आश्रित, विद्वान्‌ अग्‍निहोत्री वगैरेंच्या स्त्रियांशीं गमन केले तर प्रायश्चित्त. जननी, बहीण, आपली मुलगी व सून यांच्याशी गमन केलें असतां प्रायश्चित्त. भावाच्या स्त्रीशीं गमन केलें तर प्रायश्चित्त.

‘‘माधवीयांत व्याघ्र’’---जो आश्रित, विद्वान्‌, व अग्‍निहोत्री यांच्या स्त्रिया, आचार्य व राजा यांच्या स्त्रिया, विरक्त स्त्री, दाईण, मुलगी, मुलाची मुलगी, आईची मैत्रीण व बापाची मैत्रीण यांच्याशी गमन करील, त्‍यानें गुरुतल्‍पाचें व्रत करावें. हें एक दिवसापेक्षां अधिक अशा बुद्धिपूर्वक अत्‍यंत अभ्‍यासा विषयीं जाणावें. ‘‘याचविषयीं मनु’’---ब्राह्मण अज्ञानानें चांडाल व अंत्‍यज यांच्या स्त्रियांशीं गमन केल्‍यानें, यांचें भोजन केल्‍यानें व यांचा प्रतिग्रह घेतल्‍यानें पतित होतो. जर ज्ञानपूर्वक हीं करील तर तो साम्‍यतेला पावेल. येथें अज्ञानानें नऊ वर्षे व ज्ञानपूर्वक मरण जाणावें. कारण, ‘‘जननी, बहीण, मुलगी व सून यांच्याशी गमन केलें तर अतिपातक जाणावें हें अतिपातकी आहेत म्‍हणून यांनी अग्‍नीत प्रवेश करावा. यावाचून त्‍यांची दुसरी निष्‍कृति दिसतच नाहीं’’ असें कात्‍यायनाचें वचन आहे. ‘‘वृद्धहारीत देखील’’---आई, मुलगी, बहीण व सून यांच्यांशी गमन करणें ती अतिपातकें होत. अतिपातक्‍यांनीं तत्‍काळ अग्‍नींत प्रवेश करावा. ‘‘संवर्त’’---जो नीच पुरुष आपली माता, सून व आपली कन्या यांच्याशी गमन करील, त्‍याची निष्‍कृतिच दिसत नाही. ‘‘भावाच्या बायकोशी गमन केलें असतां त्‍याविषयीं संवर्त’’ चुलत्‍याची स्त्री व भावाची स्त्री यांच्यांशी गमन केलें तर गुरुतल्‍पव्रत करावें. या शिवाय दुसरी निष्‍कृति (प्रायश्चित्त) सांगण्यांत येत नाही. हें अज्ञानपूर्वक पुष्‍कळ काळपर्यंत अभ्‍यासाविषयीं जाणावें. बुद्धिपूर्वक तर मरण येई पर्यंतच प्रायश्चित्त जाणावें. ‘‘जें तर याज्ञवल्‍क्‍य’’ ‘‘जो नियोगावाचून भावाच्या बायकोशी गमन करील त्‍यानें चांद्रायण प्रायश्चित्त करावें’’ असें म्‍हणतो, तें समान वर्णाची नसून व्यभिचारिणी असणार्‍या अशा भावाच्या बायकोविषयीं जाणावें. ‘‘कनिष्‍ठ भावाच्या बायकोच्या गमनाविषयीं तर चतुर्विंशतिमतांत’’ जो बुद्धिपूर्वक आपल्‍या कनिष्‍ठ भावाच्या बायकोशीं गमन करील त्‍यानें दोन कृच्छ्रें किंवा सांतपन करावें. ‘‘आचार्याच्या बायकोशी गमन केलें तर त्‍याविषयीं जातूकर्ण्य’’---आचार्य, उपाध्याय वगैरेंच्या बायकांशीं गमन केलें तर गुरुतल्‍पव्रत करावें. ‘‘जें तर चतुर्विंशतिमतांत’’ ‘‘जो ब्राह्मण उपाध्यायाच्या स्त्रीशी गमन करील त्‍यानें चांद्रायण करावें. आचार्याच्या स्त्रीशीं गमन करील तर पराक करावें.’’ असें बौधायनाचें वचन आहे. तें व्यभिचारिणी अशा उपाध्याय वगैरेंच्या स्त्रियांविषयी जाणावे.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP