प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १३३ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘पाकोत्तरं केशकीटादिपाते तु प्रचेताः’’ अन्नं भोजनकाले तु मक्षिकाकेशदूषितं। अनंतरं स्पृशेदापस्तच्चान्नं भस्मना स्पृशेत्।
तेन सह पक्वं तु त्याज्यं ‘‘विशुद्धमपिचाहारं मक्षिकाकृमिजंतुभिः।
केशरोमनखैर्वापि दूषितं परिवर्जयेत् इति हारीतोक्तेः’’ ‘‘चंडालादि दृष्टे तु ब्रह्मपुराणे’’ चंडालपतितामेध्यैः कुनखैः कुष्टिना तथा। ब्रह्मप्रसूतिकोदक्या कौलेयककुटुंबिभिः। दृष्टं वा केशकीटाक्तं मृद्भस्मकनकांबुभिः।
शुद्धमद्यात्सहृल्लेखं प्रदुष्टं व्युष्टमेव चेति कौलयकः श्र्वा कुटुंबी प्राणिविशेषः। सहृल्लेखं विष्ठादिस्मारकं। व्युष्टं पर्युषितम्।
अन्न शिजल्यानंतर व शिजण्याच्या पूर्वीं केस किडे पडलें तर त्याची व्ययस्था. चांडाळ वगैरेंनीं अन्न पाहिलें तर.
‘‘स्वयंपाक झाल्यानंतर केस किडे वगैरे पडले तर प्रचेतस्’’---भोजनाचे वेळीं अन्न, माशा व केस यांच्या योगानें दूषित झालें तर लागलींच उदकाचा स्पर्श करून त्या अन्नास भस्माचा स्पर्श करावा. केस व किडे यांच्यासकट शिजलेलें अन्न तर टाकावें. कारण ‘‘माशा, किडे, जंतु किंवा केस, रोम व नखें यांनी दूषित झालेलें अन्न शुद्ध जरी असलें तरी तें टाकावें अशी हारीताची उक्ति आहे.’’
‘‘चांडाळ वगैरेंनीं पाहिलें तर ब्रह्मपुराणांत’’ चांडाल, पतित, मलीन, कुनाख, कुष्टी, ब्राह्मणाची विटाळशी स्त्री, कुत्रा व कुटुंबी यांनीं पाहिलेलें किंवा केस व किडे यांनी युक्त असें अन्न, माती, भस्म, सोनें व पाणी यांच्या योगानें शुद्ध करून खावें. तसेंच विष्ठा इत्यादिकांचें स्मरण करविणारें, बिघडलेलें व शिळें अन्न शुद्ध करून खावें.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP