प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १० वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘शंखः’’ ऊनैकादशवर्षस्य पंचवर्षात्परस्य च। प्रायश्चित्तं चरेद्भाता पिता वान्यः सुहृज्जनः।
अतो बालतरस्यास्य अपराधे न पातकं।
राजदंडो न दातव्यः प्रायश्चित्तं न विद्यते इति।
‘‘कुमारः’’ मद्यमूत्रपुरीषाणां भक्षणे नास्ति कश्र्चन।
दोषस्त्वापंचमाद्वर्षादूर्ध्वं पित्रोः सुहृद्गुरोरिति ‘‘गौतमः’’ प्रागुपनयनात्कामचारकामवादकामभक्षा इति सुरापाननिषेधस्तु जात्याश्रय इति स्थितिः इति कुमारवाक्यादनुपेस्तु यो बालो मद्यं मोहात्पिबेद्यदि।
कृच्छ्रत्रयं गुरुः कुर्यान्माता भ्राता तथा पितेति स्मृतेश्र्चानुपेतस्य दोषोऽस्त्येवेति विज्ञानेश्र्वरः।
एतद्वचनद्वयस्य पंचमवर्षप्रवृत्युत्तरपरतयाऽप्युपपत्तेस्तत्रानुपेतस्य दोषः।
वर्षचतुष्टयपर्यंतं न दोष इति ‘‘यत्तु स्मृत्यंतरे’’ जातमात्रः शिशुस्तावद्यावदष्टौ समावयः। सहि गर्भसमो ज्ञेयो व्यक्तिमात्र प्रदर्शितः। भक्ष्याभक्ष्ये तथा ज्ञेये वाच्यावाच्ये तथानृते। तस्मिन्काले न दोषः स्यात्स यावन्नोपनीयत इति तन्मद्येतरविषयं.
पांच वर्षांच्या आंत व पुढें असलेल्या बाळकाच्या प्रायश्चिता विषयी.
‘‘शंख’’---पांच वर्षांच्या पुढें व अकरा वर्षांच्या आंत असलेल्याचें प्रायश्चित्त त्याचा भाऊ, बाप किंवा दुसरा आप्त ह्यानें करावे. म्हणून बाळकाच्या अपराधाविषयीं पातक नाहीं. त्याला राजाकडून शिक्षा देववूं नये व त्याला प्रायश्चित्त नाही. ‘‘कुमार’-पांच वर्षांपर्यंत मद्य, मूत्र व पुरीष यांचे भक्षण झालें असतां कोणताही दोष नाही. पांच वर्षांच्या पुढें आई, बाप, आप्त व गुरू यांस दोष घडतो. ‘‘गौतम’’ -मुंजीच्या पूर्वी इच्छेस वाटैल त्याप्रमाणे आचरण करणें, बोलणें व खाणें ह्यांस दोष नाही. ‘मद्य पिण्याचा जो निषेध आहे तो तर जातीवर अवलंबून आहे अशी व्यवस्था आहे’ अशा कुमाराच्या वाक्यावरून आणि ‘जर मुंज न झालेला बाळक अज्ञानानें मद्यपान करील, तर त्याचा गुरू, माता, भाऊ व बाप यांनी तीन कृच्छ्रें प्रायश्चित्त करावें अशी स्मृति आहे ह्यावरून मुंज न झालेल्यास दोष आहेच असें विज्ञानेश्र्वर म्हणतो. या दोन वचनांची पाचवें वर्ष लागण्याच्या पुढें उपपत्ति होते, म्हणून त्यांत (पाच वर्षांच्या पुढे) उपनयन न झालेल्यास दोष आहे. चार वर्षे पावेंतों दोष नाही. ‘‘जें दुसर्या स्मृतींत’’ बाळक उत्पन्न झाल्यापासून आठ वर्षांचा होई तोपर्यंत गर्भाप्रमाणें केवळ व्यक्ती वरून ओळखण्यांत येणारा असा जाणावा, म्हणून जों पर्यंत त्याची मुंज होणार नाहीं त्या काळा पर्यंत खाण्यास योग्य व खाण्यास अयोग्य, जाणण्यास योग्य असें कर्म, बोलण्यास योग्य व बोलण्यास अयोग्य व खोटे बोलणें यां विषयी त्याला दोष नाहीं असे वचन आहे तें मद्यावाचून दुसर्या विषयीं आहे.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP