प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १२२ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘पराशरः’’ एकपंक्त्युपविष्टानां विप्राणां सहभोजने। यद्येकोऽपि त्यजेत्पात्रं शेषमन्नं न भोजयेत्।
मोहाद्भुंजीत यस्तत्र पंक्तावुच्छिष्टभोजनः। प्रायश्चित्तं चरेद्विप्रः कृच्छ्रं सांतपनं तथा। एतच्चकामतः।
‘‘यत्तु माधवीये स्मृत्यंतरं’’ यस्तु भुंक्ते द्विजः पंक्त्यामुच्छिष्टायां कदाचन।
अहोरात्रोषितोभूत्वा पंचगव्येन शुध्यतीति तदकामतः। ‘‘निंदितपंक्तिभोजनेंऽगिराः’’ यस्तु पंक्तिषु भुंजीत कुत्सितानां विशेषतः।
अहोरात्रोषितः स्नातः पंचगव्येन शुध्यति।
‘‘क्षत्रियादिपंक्तिषु विष्णुः’’ ब्राह्मणः क्षत्रियपंक्तावुपविश्यासंस्पृशन्यदा भुंक्ते तदा नक्तमाचरेद्वैश्यपंक्त्यामेकरात्रं। शूद्रपंक्त्यां व्द्यहमाचरेदिति
इति क्रियादुष्टाशनप्रायश्चित्तम्.
ब्राह्मण एका पंक्तीत बसून जेवीत असतां त्यांतून एखादा उठून गेल्यावर दुसरे जर जेवतील तर प्रायश्चित्त. निंद्यांच्या पंक्तीत बसून जेवल्यास प्रायश्चित्त.
‘‘पराशर’’---एका पंक्तीत बसून ब्राह्मणांचें बराबर जेवण चाललें असतां त्यांतून जर एखादा ब्राह्मण पात्रावरून उठून जाईल तर बाकी राहिलेलें अन्न (यजमानानें) खाऊं देऊं नये. त्या पंक्तीत जर एखादा ब्राह्मण कदाचित् अज्ञानानें तें अन्न खाईल तर तो उष्टें खाणारा होतो, म्हणून त्यानें सांतपन कृच्छ्र करावें. हें (प्रायश्चित्त) बुद्धिपूर्वकाविषयी जाणावे. ‘‘जी तर माधवीयांत दुसरी एक स्मृति’’---जो ब्राह्मण उष्ट्या अशा पंक्तीत कदाचित् जेवील त्यानें एक दिवस उपवास करून पंचगव्य प्यावें म्हणजे तो शुद्ध होईल’’ अशी आहे ती अज्ञानपूर्वकाविषयी आहे. ‘‘निंद्यांच्या पंक्तींत बसून भोजन केलें असतां अंगिरस’’---जो विशेषेंकरून निंद्यांच्या पंक्तींत बसून जेवील, त्यानें एक दिवस उपास करून स्नान करून पंचगव्य घ्यावें म्हणजे तो शुद्ध होईल. ‘‘क्षत्रियादिकांच्या पंक्तीविषयीं विष्णु’’---जर ब्राह्मण क्षत्रियांच्या पंक्तीत बसून स्पर्श न करतां जेवील तर त्यानें नक्त करावें. जर वैश्यांच्या पंक्तीत बसून जेवील तर एक दिवस उपास करावा. शूद्रांच्या पंक्तीत बसून जेवील तर दोन दिवस उपास करावा.
या प्रमाणें क्रियेनें दुष्ट होणार्या (अन्नादिकाच्या) भक्षणाचें प्रायश्चित्त.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP