प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ३४ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
मासोपवासकृच्छ्रमाह ‘‘जाबालः’’ अनश्र्नन्मासमेकंतु महापातकनाशनमिति ‘‘यावककृच्छ्रमाह’’ ‘‘शंखः’’ गोपुरीषा द्यवानश्र्नन्मासमेकं समाहितः। व्रतं तु यावकं कुर्यात्सर्वपापापनुत्तये। तप्तकृच्छ्रमाह ‘‘मनुः’’ तप्तकृच्छ्रं चरन्विप्रोजलक्षीरघृतानिलान्।
प्रतित्र्यहं पिबेदुष्णान्सकृत्स्नायी समाहितः। ‘‘पराशरः’’ षट्पलं तु पिबेदंभस्त्रिपलं तु पयः पिबेत्।
पलमेकं पिबेत्सर्पिस्तप्तकृच्छ्रो विधीयते। तप्तकृच्छ्रमुक्त्वा ‘‘शंखलिखितौ’’ एष एव शीतैः शीतकृच्छ्र इति.
मासोपवास वगैरे कृच्छ्रें.
मासोपवास कृच्छ्र, यावककृच्छ्र, तप्त कृच्छ्र व शीत कृच्छ्र यांची लक्षणे
‘‘जाबाल’’ मासोपवास कृच्छ्र सांगतो---एक महिना पावेंतो उपवास केले असतां ते मोठ्या पातकाचा करतात. ‘‘शंख’’ यावककृच्छ्र सांगतो---गाईच्या शेणांतून पडलेले जव एक महिनापावेंतो खावे. हें यावककृच्छ्र नावाचें व्रत सर्व पातकांचा नाश होण्याकरितां स्वस्थ मानानें करावे. ‘‘मनु’’ तप्तकृच्छ्र सांगतो---तप्तकृच्छ्र करणार्या ब्राह्मणानें रोज एक वेळ स्नान करून मन स्वस्थ ठेऊन तीन दिवस ऊन पाणी, पुढें तीन दिवस ऊन दुध, त्यानंतर तीन दिवस ऊन तूप, व पुढें तीन दिवस वायु भक्षण करून रहावें. ‘‘पराशर’’---ज्याला तप्तकृच्छ्र करावयाचा असेल त्याने सहा पळें पाणी प्यावें, तीन पळें दुध प्यावें, व एक पळ तूप प्यावें. ‘तप्तकृच्छ्र सांगून’ ‘‘शंख व लिखित’’---हेच पूर्वीं सांगितलेले पदार्थ थंड घेतले असतां त्याला शीतकृच्छ्र म्हटलें आहे.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP