प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ९९ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘पानसादीन्येकादश मद्यान्युक्त्वा अपर्युषिततत्पाने प्रायश्चित्तमाह पराशरः’’ द्राक्षेक्षुटंकखर्जूरपानसादेश्र्च योरसः।
सद्योजातस्तु तं पीत्वात्र्यहाच्छुध्योद्विजोत्तमः। इदं तु त्रिरात्रं द्राक्षादिरसानां मादकत्व एव द्रष्टव्यम्।
अन्यथा सद्योजातेक्षुरसादावपि स्यात्
पानसादि ताज्या मद्याच्या पानाचें प्रायश्चित्त.
‘‘पानसादि अकरा मद्यें सांगून ती ताजीं असून त्यांचें पान केलें तर त्यांविषयी पराशर प्रायश्चित्त सांगतो’’---द्राक्षें, ऊस, निळें कवठ, खजूर, फणस वगैरेंच्या तत्काळीं झालेल्या रसाचें पान जो द्विजश्रेष्ठ करील, त्याची तीन दिवसांनी शुद्धि होईल. हें तीन दिवसांचे प्रायश्चित्त रसास मादकत्व असेल तरच जाणावें, नाहीं तर तत्काळीं निघालेल्या ऊंस वगैरेंच्या रसादिकाविषयींही तें येईल.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP