प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ७७ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
एतानि च प्रायश्चित्तानि वृषवधेऽपि भवंति। निमित्तवाक्ये गवामनुवादेन तद्रतस्त्रीलिंगस्याविवक्षितत्वात्।
दानं तु स्त्रीगवीनामेव तद्वाक्ये गवां विधेयत्वेन तद्गतस्त्रीत्वस्य विवक्षिततत्वात्।
गोसहस्रं शतं वापीत्यादौ लिंगविषेषनिर्देशाभावेऽपि स्त्रीगवीनामेव तासां दुग्ध्धादिद्वारा बहूपकराकत्वात्।
अत एव गौश्र्वश्र्चाश्वतरश्र्चेत्यत्र लिंगविशेषानिर्देशऽपि तस्य द्वादशशतं दक्षिणेति तच्छद्बेनाश्र्वदिंस्तिरस्कृत्य गोपरामर्श इव स्त्रिया एवास्या ग्रहणे बहूपकराकत्वमेव निदानमिति भाति। अन्यथा तत्र वृषाणामपि दानमापद्येतेति दिक्
गाईच्या वधाची प्रायश्चित्तें बैलाच्या वधाच्या प्रायश्चित्ताविषयीं योजावी.
हीं प्रायश्चितें बैलाच्या वधाविषयीं ही होऊं शकतात. कारण निमित्त वाक्यांत गो शब्दाचा अनुवाद असल्यानें त्यांत असलेल्या स्त्रीलिंगास अविवक्षितत्व आहे. दान, तर स्त्रीलिंगी अशा गाईंचेच द्यावे. कारण वाक्यांत गाईंस विधेयत्व असल्यानें त्यांत असलेल्या स्त्रीत्वाला विवक्षित आहे. गोसहस्र किंवा गोशत इत्यादि ठिकाणीं विशेष लिंग (पुरुष किंवा स्त्री) जरी सांगितलें नाहीं तरी गाईचेंच (लिंग) घ्यावे. कारण, त्यांच्या दुधादिकाच्या योगानें पुष्कळ उपकार होण्यासारखें असते. म्हणूनच गौ (गाय किंवा बैल), घोडा व अश्र्वतर (खेचर) या ठिकाणीं अमुकच लिंग असें जरी विशेष सांगितलें नाहीं तरी ‘‘त्याची बाराशें दक्षिणा’’ यांत तत् शद्बावरून घोडे वगैरे इत्यादि वर्ज्य करून जसें गोचें (गाईचें किंवा बैलाचें) ग्रहण करण्यांत येते त्याप्रमाणें याच्या (बैलाच्या) स्त्रीच्या (गाईच्या)च ग्रहणा विषयीं पुष्कळ उपकार होणें हेंच मूळ कारण असावें असें वाटते. असें जर न मानिले तर त्या ठिकाणीं बैलांच्याही दानाची प्राप्ति येईल, अशी दिशा आहे.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP