‘‘अस्थ्यादिदूषितान्नाशनेब्रह्मपुराणे’’ अस्थ्रा तु दूषितं चान्नं भुंजानस्तु यदा भवेत्। स्नात्वार्कमर्चयित्वा तु घृतं प्राश्य विशुध्यतीति।
‘‘शवदूषितजलपाने पराशरः’’ कूपे च पतितं दृष्ट्वा श्र्वशृगालौ च मर्कटें। अस्थिचर्मादिपतितं पीत्वा मेध्या अपोद्विजः।
नारं तु कुणपं काकं विड्वराहं खरोष्ट्रकं। गावयं सौप्रतीकं च मायूरं खाडगं तथा। वैयाघ्रमार्क्षं सैहं वा कूपे यदि निमज्जति।
तडागस्याथ दुष्टस्य पीतं स्यादुदकं यदि। प्रायश्चित्तं भवेत्पुंसां क्रमेणैतेन सर्वशः। विप्रः शुद्धेत्रिरात्रेण क्षत्रियस्तु दिनद्वयात्।
एकाहेन तु वैश्यस्तु शूद्रो नक्तेन शुध्यति। सुप्रतीको गजः। खाडगो मृगाविशेषः। ‘‘हारितः’’ किन्ने भिन्ने शवे चैव तत्रस्थं यदि तत्पिबेत्। शुत्घ्धै चांद्रायणं कुर्यात्तप्तकृच्छ्र मथापिवेति तत्कामतोऽत्यंताभ्यासे। कामतो मानुषशवोपहतजलपानाभ्यासे वा चांद्रायणतप्तकृच्छ्रयोः शक्त्या व्यवस्था। ‘‘शवदूषिते स्नानमात्रेऽपिहारीतः’’ यदि कश्चित्ततः स्नायात्प्रमादेन द्विजोत्तमः। जपंस्त्रिषवणस्नानादहोरात्रेण शुध्यति कामतो द्वैगुण्यादिकल्प्यं। ‘‘बृहद्विष्णुः’’ जलाशये ष्वथाल्षेषु स्थावरेषु महीतले।
कूपवत्कथिता शुद्धिमर्हत्सु न तु दूषणं। वापीकूपतडागेषु दूषितेषु विशोधनं।
घटानां शतमुध्दृत्य पंचगव्यं ततः क्षिपेत् इति ‘‘अंगिराः’’ कूपे विण्मूत्रसंस्पृष्टे पीत्वा तोयं द्विजोत्तमः।
त्रिरात्रेण विशुध्येत्तु कुंभे सांतपनं स्मृतं।
हाडें वगैरेंनीं दूषित असें अन्न खाल्लें तर प्रायश्चित्त. मनुष्य, कुत्रें वगैरेंच्या प्रेतानें दूषित झालेलें पाणी प्यालें असतां प्रायश्चित्त.
‘‘हाडें वगैरेंनीं दूषित अशा अन्नाच्या भक्षणाविषयी ब्रह्मपुराणांत’’ जो हाडाच्या योगानें दूषित झालेलें अन्न खाईल, त्यानें स्नान करून सूर्याची पूजा करून तूप प्यावें म्हणजे तो शुद्ध होईल. ‘‘प्रेतानें दूषित झालेल्या उदकाच्या पाण्याविषयीं पराशर’’---कुव्यांत कुत्रें कोल्हें, वानर, हाड, चामडें वगैरे पडलें असतां ती उदकें अपवित्र होतात. तसेंच मनुष्याचें प्रेत, कावळ्याचें, गांवडुकराचें, गाढवाचें, उंटाचें, गव्याचें, हत्तीचें, मोराचें, गेंड्याचें, वाघाचें, आस्वलाचें व सिंहाचें प्रेत जर कुव्यांत पडलें तरीही ती अपवित्र होत याप्रमाणें दूषित झालेल्या तळ्याचें पाणी प्यालें असतां पुरुषांस क्रमानें हें प्रायश्चित्त होय. ब्राह्मण तीन दिवसांनीं, क्षत्रिय दोन दिवसांनीं, वैश्य एका दिवसानें व शूद्र नक्ताचे योगानें शुद्ध होईल. ‘‘हारित’’---ज्या ठिकाणीं प्रेत भिजलें असेल, छिन्नभिन्न झालें असेल, त्या ठिकाणचें जर पाणी पिण्यांत येईल, तर त्याच्या शुद्धि करितां चांद्रायण किंवा तप्तकृच्छ्र करावें. हें बुद्धिपूर्वक अत्यंत अभ्यास असतां त्या विषयीं किंवा बुद्धिपूर्वक मनुष्याच्या प्रेतानें दूषित झालेल्या उदकाच्या पाण्याच्या अभ्यासाविषयीं जाणावें. चांद्रायण व तप्तकृच्छ्र यांचीं शक्तीप्रमाणें व्यवस्था करावी. ‘‘प्रेतानें दूषित झालेल्या उदकांत केवळ स्नान करण्याविषयींही हारित’’---जर कोणी ब्राह्मण कदाचित् त्यांत स्नान करील, त्यानें तीनदां (दिवसांत) स्नान करून एक दिवस जप करावा म्हणजे त्याची शुद्धि होईल. बुद्धिपूर्वकाविषयीं दुप्पट वगैरे कल्पना करावी. ‘‘बृहद्विष्णु’’---अल्प अशा पृथ्वीवरील स्थावर जलाशयांतही कुव्या प्रमाणें शुद्धि सांगितली. मोठ्यांच्या ठिकाणीं दोष नाहीं. बावडी, कुवा व तलाव ही दूषित झालीं असतां त्यांची शुद्धि अशी करावी. त्यांतून शंभर घडे पाणी बाहेर काढून टाकून, त्यांत पंचगव्य टाकावें. ‘‘अंगिरस्’’---जर ब्राह्मण विष्ठा व मूत्र यांचा संबंध झालेल्या कुव्यांतील पाणी पिईल, तर तो तीन दिवसांनीं शुद्ध होईल. याप्रमाणें घड्यांतील पाणी पिईल तर सांतपन प्रायश्चित्त सांगितलें आहे.