प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १०१ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘अथाभक्ष्यभक्षणे विष्णुः’’ अभोज्यानामपेयानामभक्ष्याणां च भक्षणे। कृच्छ्रपादं विशुध्यर्थं चरेयुः क्षिप्रशोधनं इदं त्वज्ञानात्सकृद्भक्षणे।
‘‘ज्ञानतस्तु संवर्तः’’ अभोज्यभोजनं कृत्वा ब्रह्मक्षत्रविशां गणः। गोमूत्रयावकाहारात्सप्तरात्रेण शुध्यति।
‘‘अभ्यासे तु बृहस्पतिः’’ अलेह्यानामपेयानामभक्ष्याणां च भक्षणे। रेतोमूत्रपुरीषाणां शुध्यै चांद्रायणं चरेदिति।
‘‘शिष्टाविगीतमात्रे तमाखूभंगादिद्रव्यविशेषे तु अपरार्के भरद्वाजः’’ शिष्टा नाश्र्नंति यत्किंचिदन्नमूलफलादिकं।
न तद्भोज्यं द्विजातीनां भुक्त्वा चोपवसेदह इति
खाण्यास अयोग्य अशा पदार्थांचे तसेंच तमाखू भांग वगैरेंचें भक्षण केलें तर प्रायश्चित्त.
‘‘यानंतर खाण्यास अयोग्य अशांचें भक्षण केलें असतां त्याविषयी विष्णु’’--- भोजन करण्यास अयोग्य, पिण्यास अयोग्य व भक्षण करण्यास अयोग्य अशा पदार्थांचे भक्षण केलें तर शुद्धि होण्याकरितां पादकृच्छ्र प्रायश्चित्त करावें म्हणजे लवकर शुद्धि होईल. हें (प्रायश्चित्त) अज्ञानानें एक वेळां भक्षण केलें असतां त्याविषयीं जाणावें. ‘‘जाणून केलें तर त्याविषयी संवर्त’’---जर ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांचा समुदाय जेवण्यास अयोग्य अशा पदार्थांचे भोजन करील, तर त्याची गोमूत्रांत शिजवलेल्या जवाच्या आहारानें सात दिवसांनीं शुद्धि होईल. ‘‘अभ्यासाविषयीं तर बृहस्पति’’---जिभेनें चाटून खाण्यास अयोग्य, अशा पदार्थांचें भक्षण केले, तसेंच धातु, मूत व पुरीष (मळ) यांचे भक्षण केलें तर त्यांच्या शुद्धि करितां चांद्रायण करावें. ‘‘शिष्टांनीं निंद्य मानलेल्या तमाखू, भांग वगैरे पदार्था विशेषा विषयीं तर अपरार्कांत भरद्वाज’’---शिष्ट (लोक) अन्न, मूळ, फळ वगैरे जें कांहीं खात नाहींत, तें द्विजांस खाण्यास अयोग्य आहे. म्हणून जो तें खाईल त्यानें एक दिवस उपास करावा.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP