मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त १२ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १२ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

‘‘प्रयोजकादीनां फलमाहापस्‍तंबः’’ प्रयोजयिताऽनुमंता कर्ताचेति स्‍वर्गनरकफलेषु कर्मसु भागिन इति।
‘‘पैठीनसिः’’ हंतामंतोपदेष्‍टा च तथा संप्रतिपादकः।
प्रोत्‍साहकः सहायश्र्च तथा मार्गानुदेशकः।
आश्रयः शस्त्रदाता च भक्तदाता विकर्मिणां।
उपेक्षकः शक्तिमांश्र्चेद्दोषवक्तानुमोदकः।
अकार्यकारिणस्‍तेषां प्रायश्चित्तं प्रकल्‍पयेत्‌।
हंता साक्षाद्धंता मंताऽनुमंता प्रवृत्तप्रवर्तकः।
उपदेष्‍टा मर्मोद्‌घाटनादिकृत्‌।
संप्रतिपादकः पलायमानमित्रमुपरुंधत्‌ परेभ्‍यो हंतारं यो रक्षति।
प्रोत्‍साहकः स्‍तावकः।
सहायः सहागंता। अनुमोदकोहंतुहर्षमनुयोहृष्‍यति।
भक्तपदमौषधादेरप्युलक्षकं। एते च निषिद्धक्रियोद्देशे सत्‍येव दोषभाजो नान्यथा।
‘‘तथा च याज्ञवल्‍क्‍यः’’ औषधं स्‍नेहमाहारं ददद्रोब्राह्मणे द्विजः।
दीयमाने विपत्तिः स्‍नान्न स पापेन लिप्यते।
‘‘तथा’’ दाहछेद शिराभेद प्रयोगैरूपर्कुवतां।
द्विजानां गोहितार्थं तु प्रायश्चित्तं न विद्यते इति।
‘‘पराशरः’’ कूपखाते च धर्मार्थे गृहदाहे च या मृता।
ग्रामदाहे तथा घोरे प्रायश्चित्तं न विद्यत इति।
‘‘औषधदाने विशेषमाहांगिराः’’ औषधे तु न दोषोऽस्‍ति स्‍वेच्छया तु पिबेद्यदि।
अन्यथा दीयमाने तु प्रायश्चित्तं न संशय इति

कर्ता, अनुमंता इत्‍यादिकांस मिळणारें फळ. गाय व ब्राह्मण यांस औषधादि देणे. गाई विषयीं विशेष.
‘‘आपस्‍तंब’’ प्रयोजकादिकांस फळ सांगतो’’ प्रयोजयिता, अनुमंता व कर्ता हे तिघे स्‍वर्ग व नरक ह्यांची प्राप्ति करणार्‍या फळांचा उपभोग घेणारे होतात. ‘‘पैठीनसि’’-प्रत्‍यक्ष मारणारा तो हंता, एखाद्या कर्माविषयी प्रवृत्त झालेल्‍यास प्रवृत्त करणारा तो मंता, मर्मे उघडकीस वगैरे आणणारा तो उपदेष्‍टा, ज्‍याचा वध करावयाचा आहे तो पळत असतांही त्‍याला प्रतिबंध करून दुसर्‍या लोकांकडून मारणाराचें रक्षण करतो तो संप्रतिपादक, शाबासकी (मारणारास) देणारा तो प्रोत्‍साहक, बराबर जाणारा तो सहाय, रस्‍ता दाखविणारा तो मार्गानुदेशक, आश्रय देणारा तो आश्रय, शस्त्र देणारा तो शस्त्रदाता, वाईट कर्में करणारांस औषधादि देणारा तो भक्तदाता, शासन करण्याची शक्ति असून उपेक्षा करणारा तो उपेक्षक, दोष सांगणारा तो दोषवक्ता, व मारणारास हर्ष झाल्‍यानंतर ज्‍याला हर्ष होतो तो अनुमोदक होय. हे निषिद्धकर्माचा उद्देश असतांच दोषी होतात, नाही तर होत नाहींत. ‘‘तसेच याज्ञवल्‍क्‍य’’ -द्विजानें औषध, स्‍नेह (तेल) व आहार हे गाय व ब्राह्मण यांस द्यावे. ते दिले असतां जर अपघात झाला तर तो पापानें लिप्त होत नाही. ‘‘त्‍या प्रमाणें’’ गाईस बरें करणाच्या उद्देशानें डाग देणें, चिरणें व शीर कापणें या प्रयोगांच्या योगाने उपकार करणार्‍या द्विजांस प्रायश्चित्त  नाही. ‘‘पराशर’’-धर्मार्थ खोदलेला कुवा, घरास आग लागणें व भयंकर अशी गांवास आग लागणें यांत जर गाय मेली तर प्रायश्चित्त नाही. ‘‘अंगिरस्‌ औषध देण्याविषयी विशेष सांगतो’’ जर आपल्‍या इच्छेनेंच औषध पिण्यांत आलें तर दोष नाही, परंतु नुकसान होण्याच्या होण्याच्या हेतूनें औषध देण्यांत आलें तर प्रायश्चित्त आहे यांत संशय नाही.
====
‘‘उद्देष्‍टुर्मरणफलोत्‍पादने तु विष्‍णु.’’ आक्रुष्‍टस्‍ताडितो वापि धनैर्वापि वियोजितः।
यमुद्दिश्य त्‍यजेत्‍प्राणांस्‍तमाहु र्ब्रम्‍हघातकमिति ‘‘तथा’’ ज्ञातिमित्रकलत्रार्थं सुहृत्‍क्षेत्रार्थमेव वा। उत्तरार्धं तदेव।
अयं चाक्रोशकादिनिमिती त्‍युच्यत इति निबंधकृतः तेन निमित्ती पादमादध्यादिति पादप्रायश्चित्तमेव तस्‍य भवति। या तु ‘संबंधेन विना देव शुष्‍कवादेन कोपित इति वार्षिकं प्रायश्चित्तं प्रक्रम्‍य भविष्‍योक्तिः’ सा परिहासकृताक्रोशपरा

द्रव्य वगैरेंच्या संबंधानें एखाद्या व्यक्‍तीस उद्देशून मरण झालें असतां त्‍या विषयीं
‘‘एखाद्या व्यक्‍तीस उद्देशून मरण झालें तर त्‍या विषयीं विष्‍णु---’’ मार दिला असतां किंवा शिवी गाळी वगैरे केली असतां ज्‍या पुरुषास उद्देशून तो प्राण देईल त्‍याला ब्रह्मघातक म्‍हणतात. ‘‘तसेंच’’ जाति, मित्र व स्त्रीया यांकरितां किंवा आप्त व जमीन यांकरितां जो आपले प्राण ज्‍या मनुष्‍याला उद्देशून सोडील त्‍याला ब्रह्मघातकी म्‍हणतात. हा आक्रोशकांदिकांचे कारण आहे असें म्‍हटलें जातें असें निबंधकार म्‍हणतात. त्‍यावरून ‘निमित्तीनें चतुर्थांश प्रायश्चित्त करावें’ असें वचन आहे म्‍हणून त्‍याला चतुर्थांशच प्रायश्चित्त आहे. जी तर ‘हे राजा ! संबंधावाचून शुष्‍कवादानें कोपास चढविला’ अशी वार्षिक प्रायश्चित्तास आरंभ करून भविष्‍यपुराणांत उक्ति आहे ती परिहासाच्या योगानें केलेल्‍या आक्रोशाविषयीं जाणावी.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP