प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १०५ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘अथ मांसभक्षणें मनुः’’ नाकृत्वा प्राणिनां हिंसां मांसमुत्पाद्यते क्वचित्।
न च प्राणिवधः स्वर्ग्यस्तस्मान्मांसं न भक्षयेत्।
तत्र विशेषानुक्तावकामतः सकृद्भक्षणे शेषेषूपवसेदहरिति मनूक्तं ‘कामतस्तु’ अनुपाकृतमांसानीत्याद्युपक्रम्य मत्स्यांश्र्च कामतो जगध्वा सोपवासस्त्रयहं वसेदिति। ‘‘अकामाभ्यासे मनुः---’’भुक्त्वा मांसमभक्ष्यं च सप्तरात्रं यवान्पिबेदिति।
‘‘कामतोऽभ्यासे विष्णुः’’ अनर्चितं वृथा मांसं भुक्त्वा मांसं पयसा वर्तेतेति।
‘‘नरमांसादिभक्षणे उशनाः’’ नरमांसं श्र्वमांसं च गोमांसं चाश्र्वमेव च। भुक्त्वा पंचनखादीनां महासांतपनं चरेत्।
‘‘स्मृत्यंतरे’’ जग्ध्वा मांसं नराणां च बिड्वराहं खरं तथा। गवाश्र्वकुंजरोष्ट्राणां सर्वं पांचनखं तथा।
क्रव्यादं कुक्कुटं ग्राम्यं कुर्या त्संवत्सरं व्रतम्
प्राण्याची हिंसा करूं नये. बुद्धिपूर्वक असंस्कृत मासाचें भक्षण केलें तर प्रायश्चित्त. मनुष्य, कुत्रें वगैरेंचें मांस भक्षण केलें तर प्रायश्चित्त.
‘‘मांसाच्या भक्षणा विषयीं मनु.’’---प्राण्यांची हिंसा केल्यावाचून केव्हांही मांस मिळूं शकत नाही. प्राण्याचा वध हा स्वर्ग देणारा नाहीं, म्हणून मांस भक्षण करूं नये. त्यांत जेथें विशेष सांगितला नसेल त्या ठिकाणीं अज्ञानानें एक वार भक्षण घडलें तर ‘बाकीच्या विषयीं एक दिवस उपास करावा’ असें मनुनें सांगितलेलें जाणावें. बुद्धिपूर्वक (भक्षण केलें) तर---यज्ञ इत्यादिकांत संस्कृत न केलेलीं मांसे इत्यादिका पासून आरंभ करून जर बुद्धिपूर्वक मत्स्य खाल्ले तर तीन दिवस उपास करावा. ‘‘अबुद्धिपूर्वक अभ्यास असतां मनु---’’ खाण्यास अयोग्य असें मांस खाल्लें तर सात दिवस पावेंतों जव (शिजेलेले) खावे. ‘‘बुद्धिपूर्वक अभ्यास असतां विष्णु’’---असंस्कृत असें मांसाच्या भक्षणा विषयी उशनस्’’---मनुष्याचें मांस, कुत्र्याचें मांस, गाईचें मांस, घोड्याचें मांस व पंचनख इत्यादिकांचें मांस खाल्ले असतां महासांतपन व्रत करावे. ‘दुसर्या स्मृतींत’ मनुष्याचें मांस, गावडुकर, गधडें, गाय, घोडें, हत्ती व उंट यांचे मांस, पंचनख प्राण्यांचें मांस, ससाणा किंवा सिंह व गांवातील कोंबडें हे खाल्ले असतां एक वर्ष पावेंतों व्रत करावें.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP