प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ९४ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘तत्र सुरापाने प्रायश्चित्तमाह याज्ञवल्क्यः’’ वालवासी जटी वापि ब्रह्महत्त्याव्रतं चरेदिति तच्च द्वादशाद्बं।
‘‘प्रायश्चित्तांतरमाह स एव’’ पिण्याकं वा कणान्वापि भक्षये त्तु समां निशि। समामद्बं।
कणान्वा भक्षयेदद्बं पिण्याकं वा सकृन्निशीति मनूक्तेः’’ व्यवहारार्थमेव तन्नतु परलोकायेति चापरार्के।
केचित्तु भक्षयेत्त्रिसमा इति पेठुः। मानवं तु व्रतांतरमेवेत्याहुः। परे समानिशीति बहुवचनांत पेठुः।
तत्र कपिंजलाधिकरणन्यायेनाद्बत्रयं भवति मानवीये एकवचनं तु जात्यभिप्रायेणेत्याहुः।
‘‘इदं तु छर्दने सति ज्ञेयं’’ ‘‘एतदेव व्रतं कुर्यान्मद्यपश्यछर्दने कृते।
पंचगव्यं तु तस्योक्तं पवित्रं कायशोधन मिति व्यासोक्तेः’’ गौडीमाध्व्योः सकृत्पानेप्येतदेवेति विज्ञानेश्र्वरः।
सुरा, गोडी व माध्वी यांचे प्रायश्चित्त. सुरापिऊन उलटी झाली तर प्रायश्चित्त.
‘‘याज्ञवल्क्य सुरापना विषयीं प्रायश्चित्त सांगतो’’---सुरापान करणारानें धाबळ इत्यादि परिधान करून व जटा धारण करून ब्रम्हहत्त्येंत सांगितलेलें द्वादशाद्ब व्रत करावें. ‘‘दुसरें प्रायश्चित्त तोच सांगतो’’ तिळाची पेंड किंवा तांदुळांच्या कण्या एक वर्ष पर्यंत फक्त रात्रीं खाव्या. समा म्हणजे एक वर्ष. कारण, ‘‘तांदुळाच्या कण्या किंवा तिळांची पेंड एक वर्ष पर्यंत रात्रीं वेळ खावी’’ असें मनूचें वचन आहे. ‘‘हें (प्रायश्चित्त) व्यवहारासाठी आहे, परलोकाची प्राप्ति होण्याकरितां नाहीं’’ असें अपरार्कांत आहे. कित्येक तर ‘‘भक्षयेत्त्रिसमाः’’ (तीन वर्षे पर्यंत भक्षण करावे) असा पाठ करतात. मनूनें सांगितलेलें हें दुसरेंच व्रत आहे असें ह्मणतात. दूसरे ‘‘समानिशि’’ असा बहुवचनांत पाठ मानतात. त्यांत ‘‘कपिंजलाधिकरण न्यायानें’’ तीन वर्षे होतात. मनूच्या वचनांत एकवचन (वर्षाचें) आहे, तें जातीच्या अभिप्रायानें आहे असें म्हणतात. ‘‘हें (प्रायश्चित्त) तर उलटी झाली असतां जाणावें.’’ कारण, ‘‘हेंच व्रत मद्यपान करणारानें त्याला मद्य पिऊन उलटी झाली असतां करावें, आणि पवित्र असून देहाची शुद्धि करणारें पंचगव्य (पिण्यास) त्यांस सांगितले आहे’’ असें व्यासाचें वचन आहे. गौडी व माध्वी यांचे एक वेळ पान जरी घडलें तरी त्याविषयी हें जाणावें असें विज्ञानेश्र्वर म्हणतो.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP