मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त ५३ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ५३ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

‘‘यथावर्णमित्‍यनुवृत्तौ याज्ञवल्‍क्‍यः’’ चरेद्वतमहत्‍वापि घातार्थं चेत्‍समाहितः।
अनातिदेशिकत्‍वात्‍पादोनमिति ‘‘मदनादयः’’। ‘‘अथ सवनस्‍थक्षत्रियादिवधे मनुः’’ अकामतस्‍तु राजन्यं विनिपात्‍य द्विजोत्तमः।
ॠषभैकसहस्त्रा गादद्याच्छुध्यर्थमात्‍मनः। त्र्यद्बं चरेद्वा नियतो जटी ब्रह्महणोव्रतं।
गोसहस्त्रं वसनस्‍थवधेऽतिधनाढ्यस्‍य तपस्‍यशक्तयेति ‘‘मेधातिथिः’’। वैश्यहाब्दं चरेदेतदृद्याद्वैकशतं गवां।
षण्मासान्‌ शूद्रहाप्येतद्धेनूर्दद्यादृशाथवेति। ‘‘कामतस्‍तु हारीतः’’ ब्राह्मणः क्षत्रियं हत्‍वा षड्‌वर्षाणि व्रतं चरेत्‌।
वैश्यं हत्‍वा चरेदेवं व्रतं त्रैवार्षिकं द्विजः। शूद्रं हत्‍वा चरेद्वर्षं ॠषभैकादशाश्र्चगा इति।
‘‘श्रोत्रियवधे तु स एव’’ तुरीयोनं क्षत्रियस्‍य वधे ब्रह्महणि व्रतं। अर्धं वैश्यवधे कुर्यात्तुरीयं वृषलस्‍य तु

ब्राह्मणानें एखाद्यास मारण्याची खटपट केली असतां व सोमांत असलेल्‍या क्षत्रियादिकांचा वध केला असतां प्रायश्चित्त.

‘‘यथावर्ण (पृष्‍ठ १०८ पहा) याला अनुसरून याज्ञवल्‍क्‍य’’---जर ब्राह्मणानें एखाद्यास ठार मारण्याची खटपट केली असून तो जरी मेला नाही, तरी त्‍यानें (ब्राह्मणानें) त्‍या त्‍या वर्णाच्या संबंधाचें जें प्रायश्चित्त असेल ते करावे. याला अतिदेशिकत्‍व नसल्‍यामुळें चतुर्थांशानें कमी असें ‘‘मदनादि’’ म्‍हणतात. ‘‘सोमांत असलेल्‍या क्षत्रियादिकाच्या वधाविषयी मनु’’---जर एखाद्या द्विजानें अज्ञानानें सोमांत असलेल्‍या एखाद्या क्षत्रियाचा वध केला तर त्‍यानें आपली शुद्धि होण्याकरितां एक बैल व हजार गाई द्याव्या. किंवा मस्‍तकावर जटा धारण करून पवित्र होत्‍साता तीन वर्षेपर्यंत ब्रह्महत्‍येत सांगितलेले व्रत करावे. ‘सोमांत असलेल्‍याचा वध केला असतां हजार गाईंचें दान करणे ते प्रायश्चित्त करण्याविषयी अशक्त असलेल्‍या अति पैसेवाल्‍या संबंधानें आहे’’ असे मेधातिथि म्‍हणतो. वैश्यास मारणारानें एक वर्षपर्यंत व्रत करावे किंवा एकशें एक गाई द्याव्या. शूद्रास मारणारानें सहा महिनें पर्यंत हे व्रत करावे, किंवा दहा गाई द्याव्या. ‘‘बुद्धिपूर्वक (वध केला असतां) हारीत’’---ब्राह्मणानें क्षत्रियास मारलें असतां षडद्ब प्रायश्चित्त करावे. वैश्यास मारलें असतां त्र्यद्ब (तीन वर्षाचें) व शूद्रास मारलें असतां एक अद्ब प्रायश्चित्त करावें, किंवा एक बैल व दहा गाई द्याव्या. ‘‘वेद पढलेल्‍या ब्राह्मणाकडून वध झाला असतां तोच’’---क्षत्रियाचा वध झाला असतां चतुर्थांशानें कमी असें ब्रह्महत्‍येचें प्रायश्चित्त करावें. वैश्याच्या वधांत अर्धें व शूद्राच्या वधांत चतुर्थांश प्रायश्चित्त करावे.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP