‘‘मनुः’’ हत्वा हंसं बलाकां च बकं बर्हिणमेव च। वानरं श्येनभासौ च स्पर्शयेद्ब्राम्हणाय गां।
क्रव्यादांस्तु गृहान्हत्वाधेनूं दद्यात्पयस्विनीं। अक्रव्यादान्वत्सतरीमुष्ट्रं हत्वा तु कृष्णलं।
‘‘स एव’’ अभ्रिं काष्र्णायसींदद्यात्सर्पं हत्वा द्विजोत्तमः। पलालभारकं षंढे सैसकं चैव माषकं।
दानेन वध निर्णेकं सर्पादीनामशक्नुवन्। एकैकशश्र्चरेत्कृच्छ्रं द्विजः पापापनुत्तये।
प्रत्येकं प्राजापत्यं कुर्यादिति केचित्। ‘‘विज्ञानेश्र्वरस्तु’’ कृच्छ्रपदं तपोमात्रपरं तपांसि च ‘‘संवत्सरः’’ षण्मासास्त्रयश्र्चत्वारोद्वावेकश्र्चतुर्विंशत्यहोद्वादशाहः षडहस्त्रयहोऽहोरात्रा इतिकालाः एतान्येवानादेशे विकल्पेन क्रियेन्नेनसि गुरुणि गुरूणि लघुनि लघूनि इति गौतमोक्तानि’’ तानि दानतारतम्येन व्यवस्थाप्यानीत्याह। ‘‘याज्ञवल्क्यः’’ उरगेष्वायसोदंडः पंडके त्रपुसीसकं।
कोले घृतघटोदेय उष्ट्रे गुंजाहयेंऽशुकं। कोलः सूकरः। पंडकश्र्च मृगपक्षिसमभिव्याहारात् स एव न तु गोविप्रादिः।
तत्र तु तद्वधनिमित्तमेव लघुप्रायश्चित्तमिति ‘‘विज्ञानेश्र्वरः’’ मम तु यथा गोब्राह्मणवधनिषेधस्य जात्यवच्छेदेनैव प्रवृत्तेर्न तज्जातीयपंडवधे इदं प्रायश्चित्तं तथा मृगादिविशेषजातिपुरस्कारेणापि प्रायश्चित्तस्योक्तत्वात्तत्रापि न प्रवर्तते अतोयत्र जातिविशेषपुरस्कारेण प्रायश्चित्तं नोक्तं तज्जातीयपंडकवध एवैतत्प्रायश्चित्तमिति प्रतिभाति।
हंस, बाळढोक वगैरेंच्या वधाचें प्रायश्चित्त. पंडकाच्या वधाचें प्रायश्चित्त.
‘‘मनु’’---हंस, बाळढोंक, बगळा, मोर, वानर, ससाणा व भास यांपैकी एखाद्याचा वध केला तर ब्राह्मणाला गाय द्यावी. मांस खाणार्या वाघादिकांस मारलें तर पुष्कळ दुधाची गाय द्यावी. मांस भक्षण न करणार्या हरणादिकांस मारलें असतां जिचें वासरूं मोठें आहे अशी गाय द्यावी. उंटास मारलें असतां एका गुंजे एवढें सोनें द्यावे. ब्राह्मणानें सर्प मारला तर बारीक ज्याचें टोंक आहे असा लोखंडाचा दांडा ब्राह्मणास दान करावा. नपुंसकास मारलें असतां एक कडब्याचा भारा व एक मासाभार शिसें ब्राह्मणास द्यावें. जर द्विज दानाच्या योगानें सर्पादिकांच्या संबंधि सगळें पाप दुर करावयास असमर्थ असला तर, त्यानं प्रत्येकाच्या वधाचे ठिकाणीं पाप दुर होण्याकरितां कृच्छ्र प्रायश्चित्त करावें. प्रत्येकीं प्राजापत्य करावें असें कित्येक म्हणतात. ‘‘विज्ञानेश्र्वर तर’’ ‘‘कृच्छ्रपद’’ हे जेवढी म्हणून तपें (व्रतें) आहेत त्यांविषयी आहे. तपें-एक वर्ष, सहा महिने, तीन महिने, चार महिने, दोन महिने, एक महिना, चोवीस दिवस, बारा दिवस, सहा दिवस, तीन दिवस व एक दिवस हे काळ (तपाचे) होत. जेथें काळ सांगितला नसेल त्या ठिकाणीं विकल्पानें हीच करावीं ती अशी की---मोठ्या पातकांत मोठी, लहान पातकांत लहान अशी गौतमानें सांगितलेली त्यांची तारतम्यानें व्यवस्था करावी’’ असें म्हणतो.
‘‘याज्ञवल्क्य’’---सर्पांच्या वधांत लोखंडाचा दंड, पंडकाच्या वधांत कथील व शिसें, डुकराच्या वधांत तुपाचा घडा, उंटाच्या वधांत गुंजभर सोनें व घोड्याच्या वधांत वस्त्र द्यावें. पंडक हा मृग (पशु) व पक्षि यांच्या बराबर सांगण्यांत आल्यानें तोच समजावा. गाय ब्राह्मण इत्यादि समजूं नये. त्याच्या ठिकाणीं तर त्याच्या वधास उद्देशूनच स्वल्प प्रायश्चित्त सांगितलें असें विज्ञानेश्र्वर म्हणतो. मला तर-गाय, ब्राह्मण यांच्या वधाच्या निषेधास जातीच्या संबंधानेंच प्रवृत्ति आहे, म्हणून त्यांच्या जाती संबंधि पडाका (नपुंसका) च्या वधाबद्दल हें प्रायश्चित्त नाहीं. तसेंच मृग इत्यादि विशेष जातीस उद्देशून प्रायश्चित्त सांगण्यांत आल्यानें, त्यांच्या ठिकाणींही याची प्रवृत्ति होत नाही. म्हणून जेथें जाति विशेषास उद्देशून प्रायश्चित्त सांगितलें नसेल, त्या जातीच्या पंडकाच्या (नपुंसकाच्या) वधाबद्दल हें प्रायश्चित्त असावें असें वाटतें.