प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ११३ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘स्त्रीणामुच्छिष्टभोजने त्वापस्तंबः’’ शूद्रोच्छिष्टभोजने सप्तरात्रमभोजनं स्त्रीणां चेति इदं च कामतः सकृद्भक्षणे अकामतः षड्रात्रं एतत्सहचारिशूद्रोच्छिष्टभोजने दर्शनादिति केचित् परेर्धमेवाहुः।
‘‘सहभोजने तु बृहव्द्यासः’’ माता वा भगिनी वापि भार्या वान्याश्र्च योषितः। न ताभिः सहभोजक्तव्यं भुक्त्वा चांद्रायणं चरेदिति।
‘‘यत्वंगिराः’’ ब्राह्मण्या सह योऽश्र्नीयादुच्छिष्टं वा कदाचन। तत्र दोषं न मन्यंते सर्व एव मनीषिण इति तदापद्विषयं विवाह विषयं वा
स्त्रियांनीं शूद्राचें उष्टें खाल्लें तर प्रायश्चित्त. आई, बहीण वगैरे स्त्रियांबरोबर भोजन केलें तर प्रायश्चित्त.
‘‘स्त्रियांस उष्ट्याचें भोजन घडलें तर त्याविषयी आपस्तंब’’---जर स्त्रियांनीं शूद्राच्या उष्ट्या अन्नाचें भोजन केलें तर त्यांनीं सात दिवसपर्यंत भोजन करूं नये. हें (प्रायश्चित्त) बुद्धिपूर्वक एक वेळां भक्षण केलें असतां त्याविषयीं जाणावें. अज्ञानानें (घडलें तर) सहा दिवसपर्यंत (भोजन करूं नये). कारण हें स्नेही अशा शूद्राच्या उष्ट्या अन्नाच्या भोजनविषयी पहाण्यांत येतें असें कित्येक म्हणतात. दुसरे अर्धेच असें म्हणतात. ‘‘एकत्र भोजनाविषयीं तर बृहव्द्यास’’---आई, बहीण, स्त्री किंवा दुसर्या स्त्रिया यांच्या बराबर द्विजानें भोजन करूं नये. जर केलें तर चांद्रायण करावें. ‘‘जें तर अंगिरस्’’ ‘‘जर कदाचित् ब्राह्मणी बराबर उष्टें खाण्यांत येईल तर त्याबद्दल सर्व ॠषि दोष मानीत नाहींत’’ असें म्हणतो तें संकटाविषयीं किंवा विवाहाविषयीं जाणावें.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP