प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १२१ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘वृथापाकान्नभक्षणे तु शातातपः’’ यत्र नाश्र्नंति देवाश्र्च पितरश्र्च यथाविधि। वृथापाकः स विज्ञेस्तस्य नाद्यात्कथंचन।
वृथापाकस्य भुंजानः प्रायश्चित्तं चरेद्विजः। प्राणायामं त्रिरभ्यस्य घृतं प्राश्य विशुध्यति।
‘‘लिखितोऽपि’’ यस्य चाग्नौ न क्रियते यस्य चाग्रं न दीयते। न तद्भोज्यं द्विजातीनां भुक्त्वा तूपसेदहः।
‘‘तथा’’ वृथा कृशरसंयावपायसापूपशष्कुलीः। आहिताग्निर्द्विजोभुक्त्वा प्राजापत्यं चरेदिति। अनाहिताग्नेस्तूपवासः
देव व पितर यांस अर्पण न केलेल्या अन्नाचें भोजन ब्राह्मण करील तर, तसेंच साग्निक व निरग्निक यांस प्रायश्चित्त.
‘‘वृथापाकाच्या अन्नाच्या भक्षणाविषयीं शातातप’’---ज्याच्या पाकांत देव व पितर विधी प्रमाणें भोजन करीत नाहींत तो वृथापाक जाणावा. त्याचें अन्न केव्हांही खाऊं नये. जर ब्राह्मण वृथापाकाचें अन्न खाईल तर त्यानें तीन वेळां प्राणायाम करून तूप प्यावें म्हणजे तो शुद्ध होईल. ‘‘लिखित ही’’---ज्याच्या अन्नाचा होम करण्यांत येत नाहीं तसेंच ज्याच्या अन्नचें अग्रही देण्यांत येत नाहीं त्याचे अन्न द्विजास जेवण्यास अयोग्य आहे. तें खाल्लें तर एक दिवस उपास करावा. ‘‘त्याप्रमाणें’’ जर अग्निहोत्री ब्राह्मण कारणावाचून कृशर, संयाव पायस, अपूप व शष्कुली यांचें भक्षण करील तर त्यानें प्राजापत्य करावे. अनग्निकानें तर उपास करावा.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP