प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १३२ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘रजस्वलादिसंस्पर्शे तु शंखः’’ अमेध्यपतितचांडालपुल्कसरजस्वलावधूतकुणिकुनखिसंस्पृष्टानि भुक्त्वातिकृच्छ्रं चरेदिति कुणिर्हस्तविकलः एतत्कामतः। अकामतोऽर्धं। ‘‘श्र्वादिस्पृष्टभोजने तु लघुविष्णुः’’ शूद्रदृष्टं शुना वापि संस्पृष्टं प्राश्य भोजनं।
तप्तकृच्छ्रेण शुध्येत प्राजापत्येन वा पुनः। शकत्या पराको दातव्य इति धर्मस्य निश्र्चयः। क्षत्रवैश्यादिकैर्दुष्टं गर्दभैः सूकरैस्तथा।
पादहीनं चरेत्कृच्छ्रं शक्त्या सर्वं चरेद्विजः
‘‘अपवित्र, पतित वगैरेंनीं स्पर्श केलेलीं अन्नादि खाल्लीं असतां प्रायश्चित्त.
‘‘रजस्वला (विटाळशी) वगैरेंचा संसर्ग झाला तर त्याविषयीं ‘‘शंख’’---अपवित्र, पतित, चांडाळ, पुल्कस, विटाळशी, अवधूत, लुला, व कुनखी यांनीं स्पर्श केलेलीं (अन्नादि) खाल्लीं असतां अतिकृच्छ्र करावें. हें बुद्धिपूर्वका विषयीं जाणावें. अज्ञानाविषयीं तर अर्धें. ‘‘कुत्रें वगैरेंनीं स्पर्श केलेल्याचे भोजनाविषयीं लघुविष्णु’’---शूद्रानें पाहिलेलें आणि कुत्र्यानें स्पर्श केलेलें असें (अन्न) खाल्लें असतां तप्तकृच्छ्रानें शुद्धि होईल किंवा प्राजापत्यानें होईल. शक्ति असल्यास पराक प्रायश्चित्त द्यावें. असा धर्माचा (धर्मशास्त्राचा) निश्र्चय आहे. क्षत्रिय वैश्य इत्यादिकांनीं दुष्ट केलेलें (बिघडविलेलें) तसेंच गाढव डुकर यांनीं दुष्ट केलेलें (अन्नादि) ब्राह्मणानें खाल्लें असतां तीन चतुर्थांश कृच्छ्र करावें. शक्ति असल्यास सर्व (कृच्छ्र) करावें.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP