प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ५७ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘जातिमात्रक्षत्रियादिवधे मनुः’’ तुरीयो ब्रह्महत्त्यायाः क्षत्रियस्य वधे स्मृतः।
वैश्येष्टमांशो वृत्तस्थे शूद्रे ज्ञेयस्तु षोडश इति क्षत्रियस्य वधं कृत्वा चरेच्चांद्रायणत्रयं।
वैश्यस्य तु द्वयं कुर्याच्छूद्रस्यैंदवमेव तु।
अस्मिन्नेव विषये मनूक्तानि त्रैमासिकद्वैमासिकमासिकान्युपपातकसामान्यप्रायश्चित्तानि ज्ञेयानि।
‘‘अकामतस्तु याज्ञवल्कीयं’’ त्रिरात्रोपवाससहितमृषभैकादशगोदानं। मासं पंचगव्याशनं।
कृच्छ्रातिकृच्छ्रौ चेति क्रमात् ज्ञेयं न चैषां सामान्यविहितत्वाद्विशेषविहितैः प्रायश्चितैर्बाधः।
स्त्रीशूद्रविट्क्षत्रवध इति क्षत्रियादिवधस्योपपातकत्वोक्तेरानर्थक्यापातात् एवं सर्वेष्वप्युपपातकेषु सामान्यविहितानां व्यवस्था ज्ञेयां।
‘‘पराशरः’’ वैश्यं शूद्रं क्रियासक्तं विकर्मस्थं द्विजोत्तमं। हत्वा चांद्रायणं तस्य त्रिंशद्गाश्र्चैव दक्षिणा इति।
द्विजोत्तमः पतितो विप्रः क्षत्रियश्र्चेति माधवः
क्षत्रिय वैश्य व शूद्र यांचा वध केला असतां प्रायश्चित्त.
‘‘केवळ जातीनें क्षत्रिय वगैरे असणार्यांच्या वधाविषयी मनु’’---क्षत्रियाचा वध केला असतां त्याविषयी ब्रह्महत्येचा चतुर्थांश प्रायश्चित्त सांगितले आहे. आपल्या वृत्तीनें वागणार्या वैश्याच्या वधाविषयी अष्टमांश व शूद्राच्या वधाविषयी सोळावा भाग प्रायश्चित्त करावे. क्षत्रियाचा वध केला असतां तीन चांद्रायणें प्रायश्चित्त करावे. वैश्याचा वध केला असतां दोन चांद्रायणें करावी. ‘‘याचविषयी मनुनें सांगितलेली त्रैमासिक (तीन महिनें पर्यंतची), द्वैमासिक (दोन महिन्याची) व एकमासिक (एक महिन्याचें) अशी उपपातकांस सामान्य असणारी प्रायश्चित्तें जाणावी. ‘‘बुद्धिपूर्वक वध केला नसेल तर याज्ञवल्क्यानें सांगितलेले तीन महिने पर्यंत उपासानें युक्त असें ज्यांत बैल अकरावा आहे अशा दहा गाईंचें दान, एक महिना पर्यंत पंचगव्य पिणें व कृच्छ्र आणि अतिकृच्छ्र हें क्रमानें प्रायश्चित्त जाणावे.’’ ही (प्रायश्चित्तें) साधारण सांगितली त्यावरून यांस विशेषें करून सांगितलेल्या प्रायश्चितांच्या योगानें बाध येत नाही. कारण, ‘‘स्त्री, शूद्र, वैश्य व क्षत्रिय यांचा वध’’ यावरून क्षत्रियादिकांच्या वधास उपपातकांची उक्ति आहे तिला आनर्थक्य येते. याप्रमाणें सर्व उपपातकांच्या ठिकाणीं सामान्य व विशेषें करून सांगितलेली जीं प्रायश्चित्तें त्यांची व्यवस्था जाणावी. ‘‘पराशर’’---आपल्या धर्माप्रमाणें वागणारा वैश्य व शूद्र आणि आपल्या धर्माप्रमाणें वागणारा द्विजोत्तम यांचा वध केला असतां त्यास चांद्रायण व तीस गाई दक्षिणा हें प्रायश्चित्त आहे. द्विजोत्तम म्हणजे पतित असा ब्राह्मण व क्षत्रिय असें ‘‘माधव’’ म्हणतो.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP