मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त १८ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १८ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

एतच्च येष्‍वाहत्‍य व्यवहारो निषिद्धस्‍तत्‍परं।
तानि चाह ‘‘गौतमः’’ब्रह्महसुरापगुरुतल्‍पगमातृपितृयोनिसंबंधागस्‍तेननास्‍तिकनिंदितकर्माभ्‍यासिपतितात्‍याग्‍यपतितात्‍याग्‍यपतितत्‍यागिनः पतिताः पातकसंयोजकाश्र्चेति।
एतेष्‍वेव व्यवहारो निषिद्धो नान्यत्र एनस्‍विभिरनिर्णिक्तैनार्थ कंचित्‌समाचरेदिति ‘‘मानवीय’’ मेनस्‍विपद्‌मपि ब्रह्महापरमेव इतरपापेषु तु  नरकानुकूलापि नाश्यते। सर्वरहस्‍यपापेषु तु ब्रह्महत्त्यादिप्र षु मरणांतिकप्रायश्चित्ते चैवं। व्रूवहारनिरोधनाभावेन तदनुकूलशक्तभावात्‌

ज्‍यांत व्यवहार बंद होतो अशी ब्रह्महत्त्या, मद्यपान इत्‍यादि पातके.
हें ज्‍या पातकांत विशेषें करून व्यवहार बंद करण्यांत येतो त्‍याविषयी आहे. ‘‘गौतम ती पातकें सांगतो---’’ ब्रह्महत्‍या करणारा, मद्यपान करणारा, बापाच्या स्त्रीशी गमन करणारा, चोरी करणारा, नास्‍तिक, वारंवार निंद्य कर्म करणारा, पतिताचा त्‍याग न करणारा, पतित नसून त्‍याचा त्‍याग करणारा, पतित पातकांचा संयोग करणारे (पातक कालविणारे) यांच्याच विषयी व्यवहार निषिद्ध आहे, इतरांविषयी नाही. ‘‘ज्‍यांनी प्रायश्चित्त केलें नाही अशा पातक्‍यांशी कोणताही संबंध ठेवूं नये.’’ हें ‘‘मनूचें’’ एनस्‍वि (पातकी) असें पदही ब्रह्महत्‍यादि करणारां विषयींच आहे. दुसर्‍या पापां विषयीं तर ‘‘नरकानुकूला’’ शक्ति देखील नाहीशी होते. सर्व रहस्‍य पातकें, ब्रह्महत्त्यादि प्रकाश पातकें व ज्‍यांत प्राणांत (मरण) होतो असें प्रायश्चित्त याविषयी याप्रमाणेंच जाणावे. कारण त्‍यांत व्यवहाराच्या प्रतिबंधाचा अभाव असल्‍यानें त्‍याला (व्यवहाराला) अनुकूल असलेल्‍या शक्तीचा (व्यवहारनिरोधिकेचा) अभाव असतो.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP