प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ७० वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘व्यासः’’ घंटाभरणदोषेण विपत्तिर्यदि गोर्भवेत्। गोघ्नोऽर्धं तु चरेत्तत्र भूषणार्थं हि तत्समृतमिति।
‘‘आपस्तंबेनातिदाहादौ विशेष उक्तः’’ अतिदाहातिवाहाभ्यां नासिका छेदने तथा। नदीपर्वतसंरोधे मृते पादोनमाचरेत्।
‘‘अत्रापवादमाह पराशरः’’ अन्यत्रांकनलक्षाभ्यां वाहने मोचने तथा। सायं संगोपनार्थं च न दुष्येद्रोधबंधने इति।
‘‘स एव’’ अतिदाहे चरेत्पादं द्वौ पादौ वाहने चरेत्। नासिक्ये पादहीनं तु चरेत्सर्वं निपातन इति।
‘‘तथा’’ नासाभेदनदाहेषु कर्णछेदनबंधने। अतिदोहातिदाहाभ्यां कृच्छ्रं चांद्रायणं चरेत् इति तत्कपिलात्वाद्यनेकगुणवाद्विषयम् इति
घंटा, अलंकार, अतिदाह वगैरेंच्या योगानें गाय मेली तर प्रायश्चित्त.
‘‘व्यास’’---घंटा व अलंकार यांच्या दोषानें जर गाय मेली तर ज्याचे कडून गाय मेली असेल त्या ठिकाणी (त्या पातकांत) अर्धे प्रायश्चित्त करावें असें सांगितलें ते भूषणासाठी सांगितलें. ‘‘आपस्तंबानें’’ अति दाहादिका विषयी विशेष सांगितला तो असा’’ अति दाह व अतिवाह यांच्या योगानें तसेच नाकाचें छेदन केल्यानें नदी व पर्वत यांच्या ठिकाणी प्रतिबंध केल्यानें जर गाय मेली तर तीन चतुर्थांश प्रायश्चित्त करावें. ‘‘या विषयी पराशर अपवाद सांगतो’’---अंकन व लक्ष यांशिवाय दाह केला तर दोष आहे, तसेंच वाहन, मोचन (सोडणें) व संध्याकाळी गाईची जोपासना करण्याकरितां प्रतिबंध (कोंडणें) व बंधन (दोरड्यानें बांधणें) हीं केली असतां दोष नाही. ‘‘तोच’’---जर अतिदाह केला तर चतुर्थांश, वाहनाचे ठिकाणी दोन चतुर्थांश, नाकाचें छेदनादि केलें तर तीन चतुर्थांश व निपतनाचे ठिकाणीं सर्व प्रायश्चित्त करावे. ‘‘तसेंच’’ नाकाचें छेदन, दाह (डाग देणें), कान कापणें, बांधणें, अतिदोहन करणें व अतिदाह करणें यांच्या ठिकाणीं चांद्रायण कृच्छ्र प्रायश्चित्त करावे. हें (प्रायश्चित्त) कपिलत्व इत्यादि अनेक गुण असलेल्या गाई विषयी जाणावें.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP