प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १ ले
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
पापविशुद्धिहेतुत्वं प्रायश्चित्तस्याह ‘‘याज्ञवल्क्यः’’ विहितस्या ननुष्ठानान्निंदितस्य च सेवनात्।
अनिग्रहाच्चेंद्रियाणां नरः पतनमृच्छति।
तस्मात्तेनेह कर्तव्यं प्रायश्चितं विशुद्धय इति अनिग्रहादिति पर्युदाससंग्रहार्थ।
विहिताननुष्ठानानिषिद्धसेवन निमित्ते विहितं कर्म प्रायश्चित्तं।
प्रारब्धपापनाशार्थे तु कर्माणि तत्पदं गौणं। माधवविज्ञानेश्र्वरावप्येवं।
यत्तु शूलपाणीयतोडरानंदयोः पापनाशकं कर्म प्रायश्चित्तमिति तन्न तुलापुरुषादावतिव्याप्तेः क्रत्वंगभ्रेषप्रायश्चित्तेऽव्याप्तेश्र्व
प्रायश्चित्ताचा उद्देश.
‘‘याज्ञवल्क्य’’ प्रायश्चित्त हे पापाच्या विशेष शुद्धीस कारण आहे असे म्हणतो- विधिविहित कर्म (संध्यादि) न केल्यापासून, सुरा इत्यादि निंदित पदार्थांचे सेवन केल्यापासून आणि इंद्रियांचे दमन न केल्यानें मनुष्य पतित (दोषी) होतो. ‘अग्निग्रहात्’ हे (पद) निषेधाच्या संग्रहाकरितां आहे. विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय. पूर्वजन्मी संचित झालेल्या पापाचा नाश करणार्या कर्मांत प्रायश्चित्त असें पद आहे तें गौण (कनिष्ठ) आहे (मुख्य नाही). माधव व विज्ञानेश्र्वर हेही असें म्हणतात. शूळपाणि व तोडरानंद यांच्या ग्रंथांत पापाचा नाश करणारें जें कर्म तें प्रायश्चित्त असें जें सांगितलें ते बरोबर नाही. कारण, तुलापुरुष इत्यादिकाच्या ठिकाणी त्याची (त्या लक्षणाची) अतिव्याप्ति येईल आणि यज्ञाच्या अंगभूत अशा अनेक कर्मांपैकी एखाद्या कर्माचा लोप झाला असतां त्या कर्माची पूर्णता होण्याकरितां सांगितलेलें जें प्रायश्चितकर्म त्याला या लक्षणाची अव्याप्ति येईल, कारण तें कार्य पापनाशक नसून कर्माची पूर्णता होण्यासाठी आहे.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP