प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ५६ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘मिथ्याभिशंसने याज्ञवल्क्यः’’ मिथ्याभिशंसिनोदोषोद्विः समोभूतवादिनः। मिथ्याभिशस्तदोषं च समादत्ते मृषावदन्।
‘‘प्रायश्चित्तमाह वसिष्ठः’’ ब्राह्मणमनृतेनाभिशप्य पतनीयेनापतनीयेत वा मासमब्भक्ष्यः शुद्धवतीरावर्तयेत् ‘‘शुद्धवती तोन्विंद्रमित्याद्याः’’
‘‘याज्ञवल्क्यः’’ महापापोपपापाभ्यां योऽभिशंसेन्मृषापरं। अब्भक्ष्योमासमासीत स जापी नियतेंद्रियः। उपपापाभिशापे।
आवृत्तौ इदं सकृच्च महापापाभिशंसने। ‘‘गुरुविषये कामतः तदावृत्तौ तु शंखलिखितौ’’ नास्तिकः कृतघ्नः कूटव्यवहारी ब्राम्हणवृत्तिघ्नोभिथ्याभिशंसी चेत्येते षड्वर्षाणि ब्राम्हणगृहेषु भैक्षं चरेयुः संवत्सरं धौतभैक्ष्यमश्र्नीयुः षण्मासान्वा गा अनुगच्छेयुरिति एतत्सजातीयेन सजातीयेऽभिशस्ते। ‘‘विजातीये तु’’ ‘‘प्रतिलोमापवादे तु द्विगुणस्त्रिगुणोदमः।
वर्णानामानुलोम्ये तु तस्मादर्धार्धहानित इति याज्ञवल्क्योक्तदंडानुरूपं बोध्यं’’।
‘‘अथ प्रसंगान्मिथ्याभिशस्तस्य याज्ञवल्क्यः’’ अभिशस्तोमृषा कृच्छ्रं चरेदाग्नेयमेव वा।
निर्वपेत्तु पुरोडाशं वायव्यं पशुमेव च। एतदुपपातकपरं। ‘‘अतिपातके तु’’ एतेनाभिशस्तो व्याख्यात इति ‘‘वसिष्ठं’’ मासमब्भक्षणं। ‘‘अतिपापे महापापे च पैठीनसिः’’अनृतेनाभिशस्यमानः कृच्छ्रं समाचरेत्। पातकेषु महापापेषु द्विमासं कृच्छ्रमिति
दुसर्यावर खोटा आरोप केला असतां प्रायश्चित्त.
‘‘खोटा आरोप करण्याविषयी याज्ञवल्क्य’’---जो दुसर्यावर यानें ब्रह्महत्त्या वगैरे केली असता खोटा आरोप करतो त्याला दुप्पट दोष लागतो. एखाद्याच्या हातून ब्रह्महत्त्यादि दोष घडला असून तो लोकांस माहीत नसतो, त्या दोषाला जो लोकां समक्ष प्रकट करतो त्याला समान दोष लागतो. खोटा आरोप करणार्याला ज्यावर त्यानें खोटा आरोप केला असेल, त्याचा जो दुसरा दोष असेल तोही लागतो. ‘‘वसिष्ठ प्रायश्चित्त सांगतो’’---जो ब्राह्मण दुसर्या ब्राह्मणावर ब्रह्महत्त्यादिमहापातकाचा खोटा आरोप करील, किंवा गोवधादि उपपातकाचा खोटा आरोप, करील, त्यानें एक महिना पावेंतो केवळ पाणी पिऊन ‘‘एतोन्विंद्र’’ इत्यादि शुद्धवती ॠचांचा जप करावा. ‘‘याज्ञवल्क्य’’---जो ब्राह्मण दुसर्या ब्राह्मणावर ब्रह्महत्यादि महापातकांचा खोटा आरोप करील, किंवा गोवधादि उपपातकाचा आरोप करील, त्यानें आपली इंद्रिये वश ठेऊन एक महिना पावेंतो पाणी पिऊन शुद्धवती ॠचांचा जप करावा. हें सांगितलेलें प्रायश्चित्त उपपातकाचा खोटा आरोप वारंवार केला असतां त्याविषयी आणि एक वेळां महापातकाचा खोटा आरोप केला असतां त्याविषयी जाणावे. ‘‘बुद्धिपूर्वक त्यांचा (पातकांचा) वारंवार आरोप केला असतां मोठें प्रायश्चित्त करण्याविषयीं शंख व लिखित’’ (सांगतात)---नास्तिक, केलेल्या उपकाराला न स्मरणारा, खोटा व्यवहार करणारा, ब्राह्मणाची वृत्ति बुडविणारा आणि दुसर्यावर खोटा आरोप करणारा ह्यांनी सहा वर्षे पर्यंत ब्राह्मणांच्या घरी भिक्षा मागावी, किंवा एक वर्षपर्यंत धुतलेली भिक्षा (मधुकरी) खावी, अथवा सहा महिने पर्यंत गाईंची सेवा करावी. हें पूर्वी सांगितलेले प्रायश्चित्त सजातीयानें सजातीयावर खोटा आरोप केला असतां त्याविषयी समजावे. ‘‘दुसर्या जातीविषयी तर’’---प्रतिलोमांनी केलेल्या खोट्या आरोपाविषयी तर दुप्पट तिप्पट दंड योजावा. वर्णांच्या अनुलोम्यांविषयी तर त्याहून निंपटीनें कमी कमी असा दंड योजावा. ‘‘आतां प्रसंगवशानें खोटा आरोप करणार्यास (प्रायश्चित्त) याज्ञवल्क्य’’---खोटा आरोप करणारानें प्राजापत्य प्रायश्चित्त करावें, किंवा अग्नि ज्याची देवता आहे अशा पुरोडाशाच्या योगानें हवन करावें किंवा वायु ज्याची देवता आहे अशा पशूच्या योगानें यजन करावे. हें उपपातकाविषयीं आहे. ‘‘अतिपातकाविषयीं तर’’--‘‘याच्या योगानें खोटा आरोप करणारा त्याविषयी’’ ‘‘महिनापर्यंत पाणी पिणें’’ हें वसिष्ठाचें वचन जाणावे. ‘‘अतिपाप व महापाप यांविषयी पैठीनसि’’--खोटा आरोप करणारानें प्राजापत्य करावे. पातकें व महापातकें याविषयीं तर दोन महिनेपर्यंत प्राजापत्य करावे.
Last Updated : January 17, 2018
TOP