प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ११२ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘अंत्योच्छिष्टभोजने तु आपस्तंबः’’ अंत्यानां भुक्तशेषं तु भक्षयित्वा द्विजातयः।
चांद्रं कृच्छ्रं तदर्धं च ब्रह्मक्षत्रविशां विधिरिति चांद्रं चांद्रायणं। ‘‘अंगिराः’’ चंडालपतितादीनामुच्छिष्टान्नस्य भक्षणे।
चांद्रायणं चरेद्विप्रः क्षत्रः सांतपनं चरेत्।
षड्रात्रं च त्रिरात्रं च वर्णयोरनुपूर्वश इति द्विजः शुध्येत्पराकेण शूद्रः कृच्छ्रेण शुध्यतीति तूत्तरार्धं पपाठ शूलपाणिः।
सांतपनं महत् इदमज्ञानतः सकृद्भक्षणे ज्ञानतस्तु द्वैगुण्यं।
‘‘पीतोच्छिष्टपाने वृद्धशातातपः’’ पीतोच्छिष्टं तु पानीयं पीत्वा तु ब्राह्मणः क्वचित्।
त्रिरात्रं तु व्रतं कुर्याद्वामहस्तेन वा पुनरिति इदं चाकामतोभ्यासे कामतश्र्च सकृत्पाने।
‘‘कामतोऽभ्यासे तु वृद्धशातातपः’’ पीतशेषं तु यत्किंचिद्भोजने मुनिभिः स्मृतं।
अभोज्यं तद्विजातीनां भुक्त्वा चांद्रायणं चरेदिति
ज्ञानानें व अज्ञानानें ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांनीं अंत्यजाचें उष्टें अन्न खाल्लें तर प्रायश्चित्त.
‘‘अंत्यजांचें उष्टें खाल्लें असतां त्याविषयीं आपस्तंब’’---जर द्विजांनीं अंत्यजांचें खाऊन बाकी राहिलेलें अन्न खाल्लें तर ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांनीं क्रमानें चांद्रायण, कृच्छ्र व कृच्छ्रार्ध प्रायश्चित्त करावे. ‘‘अंगिरस्’’---चांडाळ, पतित वगैरेंच्या उष्ट्या अन्नाचें भक्षण घडलें तर ब्राह्मणानें चांद्रायण प्रायश्चित्त करावे. क्षत्रियानें सांतपन करावें. वैश्यानें सहा दिवस व शूद्रानें तीन दिवस पर्यंत व्रत करावें. ‘‘द्विज पराकानें व शूद्र कृच्छ्रानें शुद्ध होईल’’ असा शूलपाणीनें उत्तरार्धाचा पाठ केला. सांतपन मोठें जाणावें. हें (प्रायश्चित्त) अज्ञानानें एक वेळां भक्षण केलें असतां त्याविषयीं जाणावें. ज्ञानपूर्वक भक्षण केलें तर दुप्पट करावें. ‘‘पिऊन शेष राहिलेल्याचें पान घडलें तर त्या विषयीं वृद्धशातातप’’---जर ब्राह्मण कदाचित् पिऊन शेष राहिलेलें पाणी पिईल तर त्यानें तीन दिवसपर्यंत व्रत करावे. तसेंच डाव्या हातानें पाणी पिईल तरी देखील असेंच जाणावें. हें (प्रायश्चित्त) अज्ञानानें अभ्यास असतां त्या विषयीं आणि बुद्धिपूर्वक एक वेळां पान केलें असतां त्या विषयीं जाणावे. ‘‘बुद्धिपूर्वक अभ्यास असला तर त्या विषयी वृद्धशातातप’’---जें भोजनांत पिऊन बाकी राहिलेलें (उदकादि) थोडें जरी असलें तरी तें ॠषींनीं द्विजांस भोजनास अयोग्य सांगितलें, म्हणून ते खातील त्यांनीं चांद्रायण करावे.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP