‘‘स एव’’ कारंडवचकोराणां पिंगलाकुरस्य च। भारद्वाजादिकं हत्वा शिवं पूज्य विशुध्यति।
‘‘पराशरः’’ भारुंडचाषभासांश्र्च पारावतकपिंजलं। पक्षिणां चैव सर्वेषामहोरात्रमभोजनम्।
‘‘यत्तु संवर्तः’’ चक्रवाकं तथा क्रौंचं तित्तिरं शुकसारिके। गृध्रं श्येनमुलूकं च तथा पारावतानपि।
टिट्टिभं जालपादं च मद्गुं कुक्कुटमेव च। एवं पक्षिषु सर्वेषु दिनमेकमभोजनं।
‘‘यदपि पराशरः’’ क्रौंच सारसहंसांश्र्च चक्रवाकं च कुक्कुटं। जालपादं च शरभमहारात्रेण शुध्यति। ‘‘यदपि स एव’’ गृध्रश्येनशशदीनामुलूकस्य च घातकः। अपक्काशी दिनं तिष्ठेत्त्रिकालं मरुताशन इति तत्कामकृतवधपरं।
‘‘यत्तु संवर्तः’’ हंस बकं बलाकां च श्र्वाविधं बर्हिणं तथा।
सारसं चाप भासं च हत्वा त्रीन्दिवसान्क्षिपेत् इति तदभ्यासपरमिति माधवः।
‘‘यत्त्वंगिराः’’ काके भासेच गृध्रे च टिट्टिभे खंजरीटके। यथा गवितथाहत्त्या भगवानंगिरोऽब्रवीत् इति तत्कामतोऽत्यंताभ्यासविषयम्
करडुवा, चकोर, पिंगळा भारद्वाज वगैरे पक्षी मारले तर प्रायश्चित्त.
‘‘तोच’’--- करडुवा, चकोर, पिंगळा, कुररी, भारद्वाज वगैरेंस मारलें असतां शंकराची पूजा केल्यानें शुद्धि होईल. ‘‘पराशर’’---भारुंड, चाष, भास, पारवा व कपिंजल आणि सर्व प्रकारचे पक्षी यांस मारलें असतां एक दिवस उपास करावा. ‘‘जें तर संवर्त’’ चक्रवाक, क्रौंच, तित्तिर, पोपट, साळुंकी, गिधाड, ससाणा, घुबड, पारवे, टिटवी, जालपाद, पाणकावळा, व कोंबडा, या प्रमाणें सर्व पक्षांच्या वधाविषयी एक दिवस उपास करावा आणि ‘‘ जे पराशर’’ क्राच, सारस, हंस, चक्रवाक, कोंबडा, जालपाद व शरभ यांस मारलें असतां एक दिवस उपास केल्यानें शुद्धि होते आणि ‘‘ जें तोच’’ गिधाड, ससाणा, ससा वगैरे व घुबड यांचा वध करणारानें त्रिकाळ वायूचें भक्षण करणारा असा होत्साता शिजवलेलें न खातां (अन्न न खातां फळें वगैरे खाऊन) एक दिवस रहावें’’ असें म्हणतो, तें बुद्धिपूर्वक केलेल्या वधा विषयीं जाणावे. ‘‘जें तर संवर्त’’ ‘‘हंस, बगळा, बाळढोक, साळई, मोर, सारस, चाष व भास यांस मारे तर तीन दिवस उपास करावा’’ असें म्हणतो तें अभ्यासा विषयीं जाणावें असें माधव म्हणतो. ‘‘ जें तर अंगिरस्’’ कावळा, भास, गिधाड, टिटवी व खंजरीट यांच्या (वधा) विषयीं जशी गाईची हत्त्या तशी (हत्त्या) जाणावी असें भगवान् अंगिरसानें सांगितले’’ असें म्हणतो तें बुद्धिपूर्वक अत्यंत अभ्यासा विषयीं जाणावें.