प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ९० वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘अथापमृत्यौ तु भविष्यत्पुराणे’’ चंडालगोब्राह्मणाग्निपशुदंष्ट्रिसरीसृपैः। प्रमादान्मरणे चांद्रं तप्तकृच्छ्रमथापि वा।
‘‘स्मृत्यर्थसारे तु’’ तप्तकृच्छ्रद्वयं पंच पंचदश कृच्छ्राणि वा कृत्वा दाहादिकार्यमिति।
‘‘अंगिराः’’ अथ कश्चित्प्रमादेन म्रियेताग्न्युदकादिभिः। तस्याशौचं प्रकर्तव्यं कर्तव्या चोदकक्रियेति
चांडाळ, गाय, बैल वगैरेंच्या योगानें अपमृत्यु झाला तर प्रायश्चित्त.
‘‘अपमृत्युविषयीं भविष्यत्पुराणांत’’ चांडाल, गाय, बैल, ब्राह्मण, अगिन, पशु, दाढांचा प्राणी व सर्प यांच्या योगानें आकस्मिक मृत्यु आला तर चांद्रायण किंवा तप्तकृच्छ्र करावें. ‘‘स्मृत्यर्थंसारांत’’ दोन तप्तकृच्छ्र किंवा पाच किंवा पंधरा कृच्छ्रें करून दाहादि करावें. ‘‘अंगिरस्’’---जर कोणी अग्नि, उदक इत्यादिकांच्या योगानें प्रमादानें मरेल, तर त्याचें आशौच करावें व उदकक्रिया करावी.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP