प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ५८ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘अथ धनहर्तुः प्रेतक्रियाया अकरणे शंखः’’ प्रेतस्य प्रेतकार्याणि अकृत्वा धनहारकः। वर्णानां यद्वधे प्रोक्तं तद्व्रतं प्रयतश्र्चरेत्।
‘‘अज्ञानाद्दुर्वृत्तक्षत्रियादिवधे तु संवर्तः’’ निहत्य क्षत्रियं मोहात्त्रिभिः कृच्छ्रैर्विशुध्यति।
‘‘तथा’’ कृच्छ्रातिकृच्छ्रौ कुर्वीत स नरो वैश्यघातकः। कुर्याच्छ्रूद्रवधे विप्रः कृच्छ्रं सांतपनं तथेति।
‘‘पराशरः’’ शिल्पिनं कारुकं शूद्रं स्त्रियं वा यस्तु घातयेत्। प्राजापत्यद्वयं कृत्वा वृषैकादशदक्षिणेति।
‘‘एतानि तुं प्रायश्चित्तानि क्षत्रियादिहंतुर्विप्रस्यैव क्षत्रियादेः सजातीयवधे तु पादपादन्यूनं वैशस्य क्षत्रियवधे द्विगुणं शूद्रस्य विट्क्षत्रिययोर्वधे द्विगुणं त्रिगुणं वेत्युक्तं प्राक्’’।
‘‘व्यभिचारोत्प्रन्नवधे तु याज्ञवल्क्यः’’ चांद्रायणं चरेत्सर्वानवकृष्टान्निहत्य तु अवकृष्टा व्यभिचारजाः
द्रव्य घेणारानें उत्तर क्रिया न केली तर प्रायश्चित्त. वाईट वर्तनाच्या क्षत्रियादिकांच्या वधाचें प्रायश्चित्त.
‘‘द्रव्य घेणारानें ज्याचें द्रव्य घेतलें असेल त्याची उत्तर क्रिया न केली तर त्याविषयी ‘‘शंख’’ एखाद्या मेलेल्या मनुष्याची इष्टेत एखाद्या मनुष्यानें घेऊन जर त्याची क्रिया केली नाही तर, वर्णांच्या वधा विषयी जें प्रायश्चित्त सांगितलें असेल तें त्यानें अवश्य करावे. ‘‘अज्ञानानें दुर्वर्तन करणार्या क्षत्रियादिकांचा वध केला असतां त्या विषयीं संवर्त’’---जर अज्ञानानें क्षत्रियास मारलें तर तीन कृच्छ्रांनी शुद्धि होते. ‘‘तसेच’’ वैश्याचा वध करणार्या ब्राह्मणानें कृच्छ्र व अतिकृच्छ्र करावे. तसेंच शूद्राच्या वधाविषयी सांतपन कृच्छ्र करावे. ‘‘पराशर’’---जो शिल्प कर्म करणारा शूद्र किंवा स्त्री यास मारील, त्यानें दोन प्राजापत्यें करून बैल ज्यांत अकरावा आहे अशा दहा गाई दक्षिणा द्यावी. ‘‘ही प्रायश्चित्तें क्षत्रियादिकांस मारणार्या ब्राह्मणासच आहेत. क्षत्रियादिकांस सजातीय वधाविषयी चतुर्थांश चतुर्थांशानें कमी (प्रायश्चित्त) जाणावे. वैश्यास क्षत्रियाच्या वधाविषयी दुप्पट किंवा तिप्पट असें पूर्दीं सांगितलें.’’ ‘‘व्यभिचारापासून उत्पन्न झालेल्याच्या वधाविषयीं तर याज्ञवल्क्य’’---सर्व प्रकारच्या व्यभिचारापासून झालेल्यांच्या वधाविषयं चांद्रायण प्रायश्चित्त करावे.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP