भावगंगा - तुझ्या पाऊलांच्या राहो खुणा
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
तुझ्या पाऊलांच्या राहो खुणा कोठे कोठे
आम्हा मागोवा लाभो चुकावेत काटे ॥धृ॥
घराघरांतून फिरते वत्सल
भावाचा भुकेला फिरसी होऊन भ्रमर
रोज कासावीस होसी माया तुझी दाटे
तुझे कारुण्य वर्णाया शब्द होती थिटे ॥१॥
गीता सांगितली तू जी जीवनाची वाट
अजून दिसत नाही जीवाला पहाट
रोज रात्री अश्रूंमध्ये तुझी आस दाटे
बाळ माझा निश्चित उद्या सुधारेल वाटे ॥२॥
दहा दहा जन्म घेउनी किती शीणलासी
आजही बनून फिरसी पांडुरंगवेषीं
तुझा हा भरोसा पाहुन अचंबाही वाटे
तरी माझे पाय वळती तुझ्या त्याच वाटे ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : September 01, 2023
TOP