मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|भावगंगा|
स्वीकार नवे आव्हान

भावगंगा - स्वीकार नवे आव्हान

स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.


N/Aस्वीकार नवे आव्हान, स्वीकार नवे आव्हान
तुझ्या नसांमधिं दादा भरतिल नव नागांचे प्राण ॥धृ॥
सनातुनी तुज म्हणतिल कोणी
नवमतवादी देतिल कोणी
दृढतेला दाविती ऐरणी
सांग तयांना विश्वासाने ‘प्रिय मज गीता-गान’ ॥१॥
ऊठ उभा हो हिमालयापरि
पवित्रता साठव गंगेपरि
अवतारांचे कार्य सावरी
मातीचा अभिमान धरुनि वद ‘प्रिय मज गीता-गान’ ॥२॥
उंच रवाने सांग जगाला
‘आई’ वद रे निज आईला
लाज कशाची त्यात कुणाला
वात्सल्याला जागत म्हण तू ‘प्रिय मज गीता-गान’ ॥३॥
उदार घन-धारांचे साहस
तृप्तविते धरतीचे मानस
गीतेमधि तर सगळे नवरस
घे पिउनी, अनुभव सांगत म्हण ‘प्रिय मज गीता-गान’ ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 10, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP