मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|भावगंगा|
आम्ही घेतला योगेश्वर

भावगंगा - आम्ही घेतला योगेश्वर

स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.


आम्ही घेतला योगेश्वर आम्ही घेतला योगेश्वर
आम्हां मिळाले संतांचे आशीर्वाद अन् वर ॥धृ॥
दशोदिशा तेजोमय होती, पंचरंगीक्रांती गीत गाती
गावासंगे नाते जोडून तृप्त होती नगरं ॥१॥
आता दीन ना कुणीही उरला, "दान" शब्द हा पुरता सरला
भगवंताची सर्व लेकरे गाती भक्तीस्वर ॥२॥
मूर्तीपूजेचे शास्त्र गवसले भगवंताचे स्थानही कळले
"मनुष्य गौरव" वाढवू पाहून चराचरीं ईश्वर ॥३॥
ज्ञानेशांचे शब्द ऐकिले, नाथ तुक्यांचे भाव स्पर्शिले
दादा तुमच्या वात्सल्यातून पूर्ण भक्ती साकार ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 01, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP