भावगंगा - जय योगेश्वर भगवान !
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
सुखकर्ता भयत्राता परमानंद दाता (२) प्रभु….
आलो तुझिया द्वारीं (२) करुणा करणाऱ्या
जय योगेश्वर भगवान ॥१॥
तू तर परम कृपाळू मंगल करणारा (२) प्रभु…
भटकत भटकत आलो (२) चरणी दे थारा
जय योगेश्वर भगवान ॥२॥
बुद्धिमंद बहुत मी शून्य कर्म माझे (२) प्रभु…
भावावीण भिकारी (२) मातेसम दाता
जय योगेश्वर भगवान ॥३॥
देउनि आम्हा शक्ती लावी कार्याला (२) प्रभु….
थकता चेतन देसी (२) तू रे श्रमिकाला
जय योगेश्वर भगवान ॥४॥
विश्वातिल तव बालक नेणति रे तुजला (२) प्रभु….
भाव भक्ति दे सर्वां (२) आणी तीव चरणा
जय योगेश्वर भगवान ॥५॥
वेद स्मृति ना माहित संस्कृतिची भाषा (२) प्रभु….
डोळे भरती पाहून (२) बल दे जगदीशा
जय योगेश्वर भगवान ॥६॥
लहान अज्ञानी परि तुझेच अभिमानी (२) प्रभु….
प्राणार्पण करता रे (२) पाजिशी संजिवनी
जय योगेश्वर भगवान ॥७॥
मतलबी या जगतामधी तूच सखा एक (२) प्रभु….
क्रीडा विश्वासाची (२) तुजविण ना सुख
जय योगेश्वर भगवान ॥८॥
अद्वैतीं आनंद मिळे वेद जरी गाती (२) प्रभु….
द्वैतीं मिलन मधुर (२) योगेश्वर प्राप्ती
जय योगेश्वर भगवान ॥९॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP