भावगंगा - हातात गीता अन् मुखात राम
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
हातात गीता अन् मुखात राम
घेऊन गाठूया आपुले धाम ॥धृ॥
काम करूया घाम गाळूनी
तल्लीनतेची मूर्ती बनूनी
आपुला उद्धार, आपुले काम ॥१॥
समर्पणाचे व्रत आचरूया
भोग भोगूनी त्यागी राहूया
अर्पित जीवनिं मुक्त आराम ॥२॥
प्रेम देऊनी प्रेम घेऊया
आनंद वाटीत छंदी बनूया
प्रफुल्ल जीवनीं रंगे विराम ॥३॥
गीता माऊली करी साऊली
मार्गात आधार राम त्रिकाली
निर्भय निर्बंध विचार ठाम ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : October 02, 2023
TOP