मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|भावगंगा|
दादा! तुमच्यामुळेच

भावगंगा - दादा! तुमच्यामुळेच

स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.


दादा ! तुमच्यामुळेच अमुचे मंतरलेले जीवन झाले
तुमच्यामुळेच यशकीर्तीचे घराघरातून चंद्र प्रकटले ॥धृ॥
अहंपणाची झूल गळाली उपभोगाची ओढ आटली
तुमच्यामुळेच आसक्तीला, विरक्तीचे वरदान लाभले ॥१॥
डोळे होते नव्हती दृष्टी इच्छा होती नव्हती शक्ती
तुमच्यामुळेच दादा अमुच्या ध्येयाला आकाश गवसले ॥२॥
शब्दार्थाला तेज लाभले वाणीला पावित्र्य मिळाले
तुमच्यामुळेच भक्तीफेरीला क्रांतीचे लावण्य लाभले ॥३॥
पूजेचे विज्ञान समजले बुद्धीचे प्रामाण्य वाढले
दादा ! तुमच्यामुळेच जीवन वेदांमधली ऋचा जाहले ॥४॥
कृतीभक्तीला गती मिळाली धर्मध्वजा उजळून निघाली
तुमच्यामुळेच शतजन्मांना चिरंतनाचे मूल्य समजले ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 01, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP