भावगंगा - तरच खरा तू जवान
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
तरच खरा तू जवान बा रे तरच खरा तू जवान
तव सहवासे जागृत होईल दगडामधला प्राण
तरच खरा तू जवान ॥धृ॥
प्रभुकायीं संपू दे संपदा ऐसा हो धनवान
जनमनसंशय तोडुन साधित ऐक्या तो विद्वान ॥१॥
यज्ञ-कायीं तू हवन करी रे तन-मन-धन अभिमान
स्नेहाने जवळिक साधी तू, मानव-मानव जाण ॥२॥
सिद्धीमागुन आळस येतो कर तू पौरुष-ध्यान
काम करी दिनरात सावरी संस्कृतिची तू शान ॥३॥
महापुरुषवाणीमधिंदि विरवी आपुले जीवन-भान
संतकार्य करी रक्त आटवुन प्रसन्न मग भगवान ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : September 01, 2023
TOP