भावगंगा - नमन करू योगेशाला
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
स्वाध्यायाच्या वाटेवर भाव-वृक्ष सारे
प्रीत-रंगि सुमने सगळी, गंध निरनिराळे
उभे करति त्यातुन स्नेहल इंद्र-धनुष्याला
नमन करू योगेशाला आदिदेव त्याला ॥धृ॥
स्वाध्यायाच्या वाटेवर पशु, पक्षी, तारे
गाती गीत एकच, त्याचे सूर वाहक वारे
नाते बंधुत्वाचे तेथे, नाही बंदिशाळा
नमन करू योगेशाला आदिदेव त्याला ॥१॥
स्वाध्यायाच्या वाटेवर भेटती सज्जन
भारावल्या हृदयाचे सद्गुणांची खाण
शक्ती बुद्धी अर्पुनि तेथे, कृती होते लीला
नमन करू योगेशाला आदिदेव त्याला ॥२॥
स्वाध्यायाच्या वाटेवर वाटती विचार
नाव घेति प्रभुचे, करती आचार-प्रचार
एक एक मानव जोडति, यज्ञ म्हणती त्याला
नमन करू योगेशाला आदिदेव त्याला ॥३॥
स्वाध्यायाच्या वाटेवर नाचतो आनंद
विश्वासाच्या चांदण्यात मन होता धुंद
तेथे मीपणाची आग पांघरी शान्तीला
नमन करू योगेशाला आदिदेव त्याला ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : September 23, 2023
TOP