भावगंगा - प्रार्थना
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
जय योगेश्वर, जय योगेश्वर
सद्बुद्धी, बल दे परमेश्वर ॥धृ॥
बालक परिही अंश तुझा मी
कैसा होईन मी दिनवाणी
तू मज परमपिता परमेश्वर ॥१॥
मानव विसरुनि मानवतेला
भावशून्य जगतो जीवन हा
भाव भरी तू सकलां अंतर ॥२॥
जीवन-पुष्प फुले तव स्मृतिनी
तेच अर्पितो मी तव चरणी
पावन करि मज प्रिय परमेश्वर ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : October 06, 2023
TOP